Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

भोंदू अशोक खरातचं बीड कनेक्शन ; पत्रानंतर महिला नेत्याचा गंभीर आरोप

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
April 6, 2026
in क्राईम
0

बीड/प्रशांत बाफना
भोंदू अशोक खरात प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांना बीडमधून निनावी पत्र पाठवण्यात आलं आहे. या पत्रात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या एका महिला पदाधिकाऱ्याचे नाव आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. रुपाली चाकणकर यांच्या आशीर्वादाने बीडमधील महिला पदाधिकारी अशोक खरातकडे येथील महिला नेत होत्या, असा खळबळजनक दावा या पत्रात करण्यात आलाय. त्यामुळे, पुन्हा एकदा अशोक खरात प्रकरणावरुन रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विशेष म्हणजे गर्भलिंग निदान याबाबत चाकणकरांकडून अशोक खरात पाठराखण केली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या हेमा पिंपळे यांनी केला आहे. पिंपळे यांनी संबंधित पत्राचा दाखलाही दिला

बीडमधील डॉक्टरांकडून लिंगनिदान केलं जात होतं. या पत्रानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या हेमा पिंपळे यांनी पत्राची सत्यता तपासून पोलीस अधीक्षकांनी सुमोटो दाखल करून एसआयटीकडे हे पत्र द्यावे, याची चौकशी करावी अशी मागणी केली. तर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा लिंगनिदान होण्यासाठी पाठबळ देत होत्या, ही गंभीर बाब असल्याचा आरोप देखील पिंपळे यांनी केला. संबंधित पत्रावरील सहीची तपासणी केली तर त्या व्यक्तीपर्यंत पोहोचता येईल म्हणून त्याची सत्यता तपासण्याची मागणी केली जात आहे. अशोक खरातकडे बीडमधील महिला जात होत्या अशी चर्चा आतापर्यंत बीडमध्ये होती. परंतु, या पत्रातून त्याला उजाळा मिळाला असल्याचं पिंपळे यांचं म्हणणं आहे.

दरम्यान, अशोक खरातप्रकरणी अद्यापही एसआयटीकडून आरोपीचा कसून तपास केला जात आहे. या तपासातून दररोज नवनवे कारनामे समोर येत आहेत. दुसरीकडे रुपाली चाकणकर यांनाही एसआयटीने समन्स पाठवून चौकशीसाठी बोलावले होते. तत्पूर्वी त्यांचा महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा घेण्यात आला असून राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरुनही त्या पायउतार झाल्या आहे. त्यामुळे, त्यांच्या भूमिकेकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच, आता गर्भलिंगनिदान यास त्यांनी समर्थन दिल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर बीडमधील हेमा पिंपळे यांच्याकडून केला जात आहे.

Previous Post

सर्वसामान्य कार्यकर्त्यांमुळेच भाजपा देशात प्रथमस्थानी – रविंद्र पाटील

Next Post

प्रशासनाला पाझर फुटेना, की कुणाचे पाठबळ? उपोषणकर्त्या प्राजक्ता तायडे यांची प्रकृती खालावली; पोलिसांचा मात्र ‘कानाडोळा’!

Next Post

प्रशासनाला पाझर फुटेना, की कुणाचे पाठबळ? उपोषणकर्त्या प्राजक्ता तायडे यांची प्रकृती खालावली; पोलिसांचा मात्र 'कानाडोळा'!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धक्कादायक! जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी धनंजय देशमुखांवर बीडमध्ये गुन्हा दाखल; फिर्यादीत रवीराज साबळेंचाही उल्लेख

May 31, 2026

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; पाथर्डीच्या मायलेकीचा जागीच मृत्यू

May 31, 2026

मनोज जरांगे पाटील यांनी मध्यरात्री उपोषण सोडले सरकार सोबतची प्रदिर्घ चर्चा, लेखी अश्वासनावर अभ्यसकांच्या एकमतानंतर जरांगे पाटलांचा निर्णय

May 31, 2026

संतोष देशमुख प्रकरणातील साक्षीदारास जीवे मारण्याची धमकी धनंजय देशमुखसोबत राहू नको, प्रकरण मिटवून घे; ..अन्यथा जीवे ठार मारू

May 31, 2026

पोलीस अधीक्षकांचा धडक निर्णय: परस्पर ‘ संलग्न’ असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश; दिरंगाई केल्यास अधिकाऱ्यांवर होणार कठोर कारवाई!

May 31, 2026

मराठा आरक्षणाची धग: रणरणत्या उन्हात, खुल्या मैदानात जरांगे पाटलांचे अमरण उपोषण , 14 मागण्यांचे सरकारडून 14 अश्वासनं;पहिल्याच दिवशी आंदोलनाचे राज्यभरात तीव्र पडसाद

May 30, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..