Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

पाथर्डी तालुक्यात जास्त व्याज व आकर्षक कमिशनचे आमिष दाखवत दोन कोटी रुपयांची फसवणुक

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
April 4, 2026
in क्राईम
0

अहिल्यानगर/ प्रशांत बाफना
जास्त व्याज व आकर्षक कमिशनचे आमिष दाखवत समर्थ क्रॉप केअर या कंपनीने शहरातील अनेक तरुणांची तब्बल दोन कोटी रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या कंपनीचा संचालक प्रशांत गवळी (पुणे) याच्याविरुद्ध पुण्यात यापूर्वीच फसवणुकीचा गुन्हा दाखल असून, आता पाथर्डीतील प्रकरणही त्याच गुन्ह्याशी जोडण्याची प्रक्रिया सुरू आहे.

या प्रकरणाचा उलगडा दोन गुंतवणूकदारांमधील वादातून झाला. सुरुवातीला परस्परांतील वाद म्हणून समोर आलेले प्रकरण पोलिसांत पोहोचल्यावर सखोल तपास करण्यात आला. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले.

गवळी याने सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना कंपनीत गुंतवणूक करण्याचे आवाहन केले होते. गुंतवणूक करा आणि इतरांना जोडून साखळी पद्धतीने व्यवसाय वाढवा. त्यातून अधिक व्याज आणि कमिशन मिळेल असे आश्वासन देण्यात आले होते. या आमिषाला बळी पडून काही तरुणांनी पुण्यातील कार्यालयाला भेट देत स्वतः गुंतवणूक केली, तसेच ओळखीतील इतरांनाही यात सहभागी करून घेतले. प्रारंभी गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळाल्याने विश्वास वाढत गेला. परिणामी अनेकांनी लाखो रुपयांची गुंतवणूक केली. मोठी रक्कम जमा करणाऱ्यांना परदेश दौऱ्याचे आमिष दाखवून दुबई सहलींचे आयोजनही करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

मात्र, सुमारे एक ते दीड वर्ष व्यवसाय सुरळीत सुरू राहिल्यानंतर अचानक परतावा व एजंटांचे कमिशन बंद झाले. यानंतर गुंतवणूकदारांमध्ये संशय निर्माण झाला. ज्यांनी इतरांना गुंतवणुकीस प्रवृत्त केले होते, त्या एजंट आणि गुंतवणूकदारांमध्ये वाद वाढू लागले. काही दिवसांपूर्वी झालेल्या हाणामारीनंतर हे प्रकरण थेट पोलिसांपर्यंत पोहोचले.

पोलिस तपासात शहरातील सुमारे 40 ते 50 युवकांनी एक लाख ते सोळा लाखांपर्यंत गुंतवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. एकूण फसवणुकीची रक्कम दोन कोटींपेक्षा अधिक असल्याचा अंदाज असून, तपास पुढे सरकल्यानंतर हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.विशेष म्हणजे कंपनीचा संचालक धार्मिक भावनेचा वापर करत असल्याचेही समोर आले असून, फसवणूक झालेल्या अनेक तरुणांचा त्याच्यावर विश्वास बसण्यामागे हा घटक कारणीभूत ठरल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे

Previous Post

पुतळ्याच्या आडून कोणाचा डावा यशस्वी होऊ देऊ नका – जरांगे पाटील

Next Post

अहिल्यानगर पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘पोलीस शौर्य सन्मान २०२६’ ने शेवगांवचे पोलीस अंमलदार शाम गुंजाळ- यांचा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या शुभहस्ते सन्मानित

Next Post

अहिल्यानगर पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा; 'पोलीस शौर्य सन्मान २०२६' ने शेवगांवचे पोलीस अंमलदार शाम गुंजाळ- यांचा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या शुभहस्ते सन्मानित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाराष्ट्र हळहळला: दिंडोरीत भीषण अपघात भरधाव कार विहिरीत कोसळली; एकाच कुटुंबातील चिमुकल्यांसह 9 जणांचा मृत्यू

April 5, 2026

अहिल्यानगर पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘पोलीस शौर्य सन्मान २०२६’ ने शेवगांवचे पोलीस अंमलदार शाम गुंजाळ- यांचा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या शुभहस्ते सन्मानित

April 4, 2026

पाथर्डी तालुक्यात जास्त व्याज व आकर्षक कमिशनचे आमिष दाखवत दोन कोटी रुपयांची फसवणुक

April 4, 2026

पुतळ्याच्या आडून कोणाचा डावा यशस्वी होऊ देऊ नका – जरांगे पाटील

April 4, 2026

साकळीत राजकीय भूकंपाची चाहूल!आजच्या प्रवेश सोहळ्यानंतर शिंदे गटाला मोठा धक्का बसणार?

April 4, 2026

दत्त मंदिराजवळ वादळाचा कहर – उंबराचे भलेमोठे झाड कोसळले; महिला थोडक्यात बचावली!

April 3, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..