Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

अहिल्यानगर पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘पोलीस शौर्य सन्मान २०२६’ ने शेवगांवचे पोलीस अंमलदार शाम गुंजाळ- यांचा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या शुभहस्ते सन्मानित

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
April 4, 2026
in शासकीय
0

अहिल्यानगर/प्रशांत बाफना
कर्तव्यनिष्ठा, धाडस आणि समाजसेवेचा वसा जपणाऱ्या पोलिसांच्या सन्मानासाठी आयोजित ‘९२.७ बिग एफ एम पोलीस शौर्य सन्मान २०२६’ या सोहळ्यात अहिल्यानगर पोलीस दलाचा दबदबा पाहायला मिळाला. यामध्ये शेवगांव पोलीस ठाण्यातील कर्तव्यदक्ष पोलीस अंमलदार शाम गुंजाळ यांना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अहिल्यानगर पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या शुभहस्ते’पोलीस शौर्य सन्मान’ देऊन गौरविण्यात आले.
समाजाच्या सुरक्षेसाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शाम गुंजाळ यांनी वेळोवेळी दाखवलेले शौर्य आणि समर्पण वृत्तीची दखल या पुरस्काराद्वारे घेण्यात आली आहे. एका दिमाखदार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
शाम गुंजाळ यांना मिळालेल्या या पुरस्कारामुळे शेवगांव पोलीस ठाणे आणि संपूर्ण अहिल्यानगर पोलीस दलाची मान अभिमानाने उंचावली आहे. जनतेच्या सेवेसाठी रात्रंदिवस तत्पर असणाऱ्या एका सच्च्या पोलीस कर्मचाऱ्याचा हा गौरव असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.
“हा सन्मान केवळ माझा नसून, माझ्या संपूर्ण टीमचा आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाचा विजय आहे. या पुरस्कारामुळे समाजाप्रती असलेली जबाबदारी अधिक वाढली असून, भविष्यातही अधिक जोमाने जनसेवेसाठी कार्यरत राहीन.”
— शाम गुंजाळ, पोलीस अंमलदार (शेवगांव)
या यशाबद्दल शाम गुंजाळ यांच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. जिल्ह्याच्या सुरक्षिततेसाठी अहिल्यानगर पोलीस सदैव कटिबद्ध असल्याचे या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे

Previous Post

पाथर्डी तालुक्यात जास्त व्याज व आकर्षक कमिशनचे आमिष दाखवत दोन कोटी रुपयांची फसवणुक

Next Post

महाराष्ट्र हळहळला: दिंडोरीत भीषण अपघात भरधाव कार विहिरीत कोसळली; एकाच कुटुंबातील चिमुकल्यांसह 9 जणांचा मृत्यू

Next Post

महाराष्ट्र हळहळला: दिंडोरीत भीषण अपघात भरधाव कार विहिरीत कोसळली; एकाच कुटुंबातील चिमुकल्यांसह 9 जणांचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आयपीएल क्रिकेट सट्टेबाजीत सोनईच्या ‘त्या’ तरुणाची १० लाखांची फसवणूक…? मार्गदर्शनाअभावी ना दाद ना फिर्याद…! स्थानिक पोलिसांच्या प्रबोधनाची नितांत आवश्यकता

May 20, 2026

आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर मारूळ गावात पोलीस प्रशासनाची महत्त्वपूर्ण बैठक

May 20, 2026

आयपीएल सट्टेबाजीचं सोनई – शनिशिंगणापूर ‘कनेक्शन’…? अहिल्यानगर एसपींचं ‘सुदर्शन’ चक्र भेदणार का? दिवसभरात होतेय लाखोंची उलाढाल…!

May 20, 2026

बोगस कुणबी प्रमाणपत्रं रद्द होणार? मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर हालचालींना वेग,

May 19, 2026

पाथर्डीत स्त्री बिनटाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर यशस्वीसात शिबिरांत 154 हून अधिक महिलांवर यशस्वी शस्त्रक्रिया

May 19, 2026

शिर्डीत तोफगोळा उत्पादन प्रकल्प; जिल्ह्यात संरक्षण उत्पादन क्षेत्राला मोठी चालना!

May 19, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..