Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

औषध खरेदी घोटाळा तापला डॉ.सचिन भायेकर यांच्या उचलबांगळीची चर्चा जोरात!

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
February 26, 2026
in आरोग्य
0

उपसंपादक : मिलिंद जंजाळे
जळगाव — जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत आरोग्य विभागात औषध खरेदी प्रकरणामुळे पुन्हा एकदा मोठा वाद पेटला असून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. निकृष्ट दर्जाच्या औषध खरेदीचे आरोप समोर येताच प्रशासनात खळबळ उडाली असून या प्रकरणाची चर्चा जिल्हाभर रंगली आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते दिनेश भोळे यांनी औषध खरेदीतील कथित अनियमिततेबाबत सातत्याने पाठपुरावा करत वरिष्ठ स्तरावर तक्रारी दाखल केल्या आहेत. आरोग्य विभागातील उच्च अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आलेल्या निवेदनांमुळे हे प्रकरण आता उच्च पातळीवर पोहोचल्याचे समजते.
सूत्रांच्या माहितीनुसार, औषध खरेदी प्रक्रियेत नियमबाह्य निर्णय, निकृष्ट दर्जाची सामग्री आणि आर्थिक अनियमिततेचे प्राथमिक संकेत आढळल्याची चर्चा प्रशासनात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भायेकर यांच्या उचलबांगळीचे संकेत मिळत असल्याची जोरदार चर्चा जिल्ह्यात आहे.
या प्रकरणामुळे आरोग्य विभागातील कामकाजावर परिणाम झाल्याचे बोलले जात असून कर्मचारी वर्गातही अस्वस्थता वाढल्याचे चित्र आहे. दरम्यान, डॉ. भायेकर यांच्या जागी स्वच्छ प्रतिमा व कार्यक्षम अधिकारी नियुक्त करण्यासाठी हालचाली सुरू असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
जर या प्रकरणात कारवाई झाली, तर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेत मोठा प्रशासकीय बदल होण्याची शक्यता व्यक्त होत असून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नागरिकांकडून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही जोर धरत आहे.
दरम्यान, औषध खरेदी घोटाळ्याचा धुरळा पुढे आणखी कोणते धक्कादायक खुलासे करणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांच्या कथित मनमानी कारभाराचे पितळ दैनिक हॅलो बातमीदारच्या माध्यमातून वेळोवेळी उघड होत असल्याची चर्चा देखील रंगली आहे.
आता प्रशासन कोणती ठोस पावले उचलते आणि उचलबांगळीची चर्चा प्रत्यक्षात उतरते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Previous Post

६७ सीसीटीव्ही तपासले, लुटीचा पर्दाफाश; रावेर पोलिसांचा मोठा विजय

Next Post

अकरा महिन्यांच्या चिमुकल्याच्या निधनाने जयकर परिवारावर दुःखाचा डोंगर

Next Post

अकरा महिन्यांच्या चिमुकल्याच्या निधनाने जयकर परिवारावर दुःखाचा डोंगर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धक्कादायक! जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी धनंजय देशमुखांवर बीडमध्ये गुन्हा दाखल; फिर्यादीत रवीराज साबळेंचाही उल्लेख

May 31, 2026

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; पाथर्डीच्या मायलेकीचा जागीच मृत्यू

May 31, 2026

मनोज जरांगे पाटील यांनी मध्यरात्री उपोषण सोडले सरकार सोबतची प्रदिर्घ चर्चा, लेखी अश्वासनावर अभ्यसकांच्या एकमतानंतर जरांगे पाटलांचा निर्णय

May 31, 2026

संतोष देशमुख प्रकरणातील साक्षीदारास जीवे मारण्याची धमकी धनंजय देशमुखसोबत राहू नको, प्रकरण मिटवून घे; ..अन्यथा जीवे ठार मारू

May 31, 2026

पोलीस अधीक्षकांचा धडक निर्णय: परस्पर ‘ संलग्न’ असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश; दिरंगाई केल्यास अधिकाऱ्यांवर होणार कठोर कारवाई!

May 31, 2026

मराठा आरक्षणाची धग: रणरणत्या उन्हात, खुल्या मैदानात जरांगे पाटलांचे अमरण उपोषण , 14 मागण्यांचे सरकारडून 14 अश्वासनं;पहिल्याच दिवशी आंदोलनाचे राज्यभरात तीव्र पडसाद

May 30, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..