Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

जळगावात आरोग्य विभागात खळबळ “३५ लाख दिले…” चर्चेनंतर निलंबनाच्या हालचाली?

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
February 25, 2026
in आरोग्य
0

उपसंपादक : मिलिंद जंजाळे
जळगाव : जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य विभाग पुन्हा एकदा गंभीर वादाच्या भोवऱ्यात सापडला असून जिल्हा आरोग्य अधिकारी पदासंदर्भात सुरू असलेल्या चर्चांमुळे प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. “मी ३५ लाख देऊन आलो आहे, ही रक्कम कुठून काढू?” असे कथित वक्तव्य संबंधित अधिकाऱ्यांनी केल्याची चर्चा जिल्हाभर वेगाने पसरत आहे.
या पार्श्वभूमीवर औषध खरेदी व आर्थिक व्यवहारांबाबत अनियमिततेच्या चर्चांमुळे संबंधित अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांच्या निलंबनाबाबत हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. मात्र यासंदर्भात अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.
औषध खरेदी प्रकरण चर्चेत
आरोग्य विभागातील औषध खरेदी प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा संशय व्यक्त केला जात असून या प्रकरणाची प्राथमिक पातळीवर माहिती संकलन सुरू असल्याचे सांगितले जाते. आर्थिक व्यवहार, पुरवठा प्रक्रिया आणि मंजुरी पद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
कर्मचारी अस्वस्थ — दबाव व वसुलीच्या चर्चा
आरोग्य विभागातील कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता वाढत असल्याचे चित्र आहे. काही कर्मचाऱ्यांकडून हप्ते, मनमानी आदेश आणि संरक्षणाच्या चर्चेमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांवर दबाव येत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
“पारदर्शकता की वसुली?” नागरिकांचा सवाल
जबाबदारीच्या पदावर असलेल्या अधिकाऱ्यांबाबत आर्थिक व्यवहारांच्या चर्चा होत असल्याने संपूर्ण आरोग्य व्यवस्थेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बदली प्रक्रियेत आर्थिक व्यवहार झाले का, तसेच कर्मचारी वर्गावर आर्थिक दबाव टाकला जात आहे का — याबाबत नागरिक स्पष्टीकरण मागत आहेत.
निलंबनाच्या हालचालींची चर्चा
सूत्रांच्या माहितीनुसार औषधी घोटाळ्याच्या संदर्भात वरिष्ठ स्तरावर अहवाल मागविण्यात आला असून चौकशीनंतर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. निलंबनाची प्रक्रिया सुरू असल्याची चर्चा असली तरी अधिकृत आदेश अद्याप समोर आलेले नाहीत.
निष्पक्ष चौकशीची मागणी
नागरिक, कर्मचारी आणि सामाजिक संघटनांकडून स्वतंत्र व निष्पक्ष चौकशीची मागणी जोर धरत आहे. आर्थिक व्यवहार, औषध खरेदी प्रक्रिया आणि प्रशासनिक निर्णयांची तपासणी होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. प्रशासन मौन — संशय वाढतोय
या सर्व चर्चांवर प्रशासनाने अधिकृत भूमिका स्पष्ट न केल्याने संशय अधिक गडद होत आहे. “नेमके सत्य काय?” हा प्रश्न सध्या जिल्ह्यात चर्चेचा मुख्य विषय बनला आहे.
संबंधित अधिकाऱ्यांवर करण्यात येणारे आरोप, निलंबनाच्या चर्चा आणि औषध घोटाळ्याबाबतची माहिती ही सध्या चर्चेच्या स्वरूपात असून अधिकृत चौकशीनंतरच सत्य स्पष्ट होणार आहे.

Previous Post

बीडमध्ये भाजपच्या सरपंच पतीची आत्महत्या

Next Post

भुसावळ–फैजपूर मार्गावरील वृक्षतोड प्रकरण तापले; कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

Next Post

भुसावळ–फैजपूर मार्गावरील वृक्षतोड प्रकरण तापले; कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

६७ सीसीटीव्ही तपासले, लुटीचा पर्दाफाश; रावेर पोलिसांचा मोठा विजय

February 25, 2026

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे माजी विधानसभा अध्यक्ष अशोक बोरेकर यांचा कार्यकर्त्यांसह ‘रिपब्लिकन सेनेत’ जाहीर प्रवेश अशोक बोरीकर यांची ‘जिल्हा उपाध्यक्ष’ पदी वर्णी

February 25, 2026

दुसखेडा पेपर मिल स्टेशन परिसरात पाण्यासाठी नागरिकांची भटकंती — ग्रामपंचायतीचे अक्षम दुर्लक्ष उघड

February 25, 2026

चुकीच्या तोलामुळे शेतकऱ्यांचे नुकसान; गणेश टोल काटा बंद करण्याची मागणी

February 25, 2026

दोन बहिणींचे अपहरण, अल्पवयीन मुलीवर अत्याचार बीड हादरल माजलगावता नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला; दहावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 25, 2026

भुसावळ–फैजपूर मार्गावरील वृक्षतोड प्रकरण तापले; कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

February 25, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..