Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

बीडमध्ये भाजपच्या सरपंच पतीची आत्महत्या

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
February 24, 2026
in राजकीय
0

बीड: /प्रशांत बाफना बीडच्या आष्टी तालुक्यातील हातोला ग्रामपंचायतीच्या विद्यमान महिला सरपंच पतीने सोमवारी (दि.23) शेतातील झाडला गळफास घेवून आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

आष्टी तालुक्यातील हातोला येथील भाजपचे सक्रिय कार्यकर्ते तथा माजी पंचायत समिती सदस्य महिला सरपंच पती बाबासाहेब गर्जे यांनी सोमवारी (दि.23) आष्टी येथे रहात्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली आहे. सरपंचपतीने हे टोकाचं पाऊल का उचललं? याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. बाबासाहेब गर्जे हे आपल्या कुटुंबासह आष्टी-शेकापूर रस्त्यावर असलेल्या घरात राहत होते.

रविवारी गर्जे हे रोजच्या प्रमाणे आपली दैनंदिन कामे आटोपून घराबाहेर पडले होते. सायंकाळी ते आपल्या घराजवळ असलेल्या शेतात गेले. मात्र,बराच वेळ झाला तरी ते घरी न आल्याने त्यांचे कुटुंबिय त्यांना बोलावण्यासाठी शेतात गेले. तेव्हा समोरचे दृष्य पाहून कुटुंबियांनी एकच आक्रोश केला.

शेतातील एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत बाबासाहेब गर्जे यांचा मृतदेह आढळून आला. या प्रकारची माहिती मिळताच गावकर्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. गर्जे हे भाजपचे सक्रिय कार्यकर्ते होते, अशी माहिती समोर आली आहे. आष्टी पंचायत समितीचे सदस्य म्हणूनही ते कार्यरत होते. तर त्यांच्या पत्नी या हातोला गावच्या विद्यमान सरंपच आहेत.

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन गर्जे यांनी नेमकी आत्महत्या का केली? त्यांच्यावर कोणाचा दबाव होता का? याबाबत पोलिस तपास करत आहेत. पोलिसांनी गर्जे यांच्या आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.

Previous Post

रायपूर छत्तीसगढ येथे खेलो इंडिया ट्रायबल गेम 2026 हॉकी करिता जावेद तडवी आणि नकुल पावरा यांची निवड

Next Post

जळगावात आरोग्य विभागात खळबळ “३५ लाख दिले…” चर्चेनंतर निलंबनाच्या हालचाली?

Next Post

जळगावात आरोग्य विभागात खळबळ “३५ लाख दिले…” चर्चेनंतर निलंबनाच्या हालचाली?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धक्कादायक! जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी धनंजय देशमुखांवर बीडमध्ये गुन्हा दाखल; फिर्यादीत रवीराज साबळेंचाही उल्लेख

May 31, 2026

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; पाथर्डीच्या मायलेकीचा जागीच मृत्यू

May 31, 2026

मनोज जरांगे पाटील यांनी मध्यरात्री उपोषण सोडले सरकार सोबतची प्रदिर्घ चर्चा, लेखी अश्वासनावर अभ्यसकांच्या एकमतानंतर जरांगे पाटलांचा निर्णय

May 31, 2026

संतोष देशमुख प्रकरणातील साक्षीदारास जीवे मारण्याची धमकी धनंजय देशमुखसोबत राहू नको, प्रकरण मिटवून घे; ..अन्यथा जीवे ठार मारू

May 31, 2026

पोलीस अधीक्षकांचा धडक निर्णय: परस्पर ‘ संलग्न’ असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश; दिरंगाई केल्यास अधिकाऱ्यांवर होणार कठोर कारवाई!

May 31, 2026

मराठा आरक्षणाची धग: रणरणत्या उन्हात, खुल्या मैदानात जरांगे पाटलांचे अमरण उपोषण , 14 मागण्यांचे सरकारडून 14 अश्वासनं;पहिल्याच दिवशी आंदोलनाचे राज्यभरात तीव्र पडसाद

May 30, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..