Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

पाथर्डी तालुक्यात भीषण अपघातात होमगार्ड जवानासह आईचा जागीच मृत्यू

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
February 17, 2026
in निधन वार्ता
0

अहिल्यानगर/प्रशांत बाफना
पाथर्डी -महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी दर्शनासाठी निघालेल्या मायलेकावर काळाने झडप घातली. कल्याण-निर्मल राष्ट्रीय महामार्गावरील टाकळी फाटा येथे दुचाकी व हुंडई कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात उमेश जगन्नाथ औटी (वय 44) आणि त्यांच्या आई कौशल्या जगन्नाथ औटी (वय 66, रा. औटीवस्ती, पाथर्डी) यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. या घटनेने पाथर्डी शहर व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महाशिवरात्रीनिमित्त उमेश औटी हे आपल्या आई कौशल्या औटी व मुलासह दुचाकीवरून पाथर्डी तालुक्यातील तोंडोळी येथील हरिहरेश्वर मंदिरात दर्शनासाठी रविवारी दुपारी निघाले होते. कोरडगाव रोडवरील टाकळी फाटा येथे समोरून येणार्‍या हुंडई कारची त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक बसली. अपघात इतका भीषण होता की उमेश औटी व कौशल्या औटी यांना गंभीर दुखापत झाली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात नेले. मात्र अहिल्यानगर येथे त्यांना हलवण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले. या दुर्घटनेत सोबत असलेली लहान मुलगी सुदैवाने बचावली असल्याची माहिती मिळाली आहे.

उमेश औटी हे पाथर्डी होमगार्ड दलात कार्यरत होते. कर्तव्यनिष्ठ व मनमिळाऊ स्वभावामुळे ते सर्वत्र परिचित होते. होमगार्डच्या सेवेसोबतच ते मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे. महाशिवरात्रीच्या दिवशीच आई-मुलाचा दुर्दैवी अंत झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
अपघाताची नोंद पाथर्डी पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे

Previous Post

यावल तालुक्यातील केळी पीक विमा अनुदान घोटाळ्याच्या आरोपांवर आधारित आक्रमक, प्रभावी आणि प्रकाशनयोग्य बातमी खाली तयार केली आहे:यावल तालुक्यात केळी विमा अनुदानात कोट्यवधींचा घोटाळा? बोगस शेतकरी दाखवून अनुदान लाटल्याचा गंभीर आरोप

Next Post

हिंगोणा गावातील निकृष्ट रस्त्यांच्या कामाबाबत तक्रार; अभियंत्याच्या चौकशीची मागणी आमदार अमोल जावळे यांनी लक्ष देण्याची गरज

Next Post

हिंगोणा गावातील निकृष्ट रस्त्यांच्या कामाबाबत तक्रार; अभियंत्याच्या चौकशीची मागणी आमदार अमोल जावळे यांनी लक्ष देण्याची गरज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धक्कादायक! जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी धनंजय देशमुखांवर बीडमध्ये गुन्हा दाखल; फिर्यादीत रवीराज साबळेंचाही उल्लेख

May 31, 2026

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; पाथर्डीच्या मायलेकीचा जागीच मृत्यू

May 31, 2026

मनोज जरांगे पाटील यांनी मध्यरात्री उपोषण सोडले सरकार सोबतची प्रदिर्घ चर्चा, लेखी अश्वासनावर अभ्यसकांच्या एकमतानंतर जरांगे पाटलांचा निर्णय

May 31, 2026

संतोष देशमुख प्रकरणातील साक्षीदारास जीवे मारण्याची धमकी धनंजय देशमुखसोबत राहू नको, प्रकरण मिटवून घे; ..अन्यथा जीवे ठार मारू

May 31, 2026

पोलीस अधीक्षकांचा धडक निर्णय: परस्पर ‘ संलग्न’ असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश; दिरंगाई केल्यास अधिकाऱ्यांवर होणार कठोर कारवाई!

May 31, 2026

मराठा आरक्षणाची धग: रणरणत्या उन्हात, खुल्या मैदानात जरांगे पाटलांचे अमरण उपोषण , 14 मागण्यांचे सरकारडून 14 अश्वासनं;पहिल्याच दिवशी आंदोलनाचे राज्यभरात तीव्र पडसाद

May 30, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..