
अहिल्यानगर/जिल्हा प्रतिनिधी प्रशांत बाफना
विद्येची देवता सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा पुण्यातील भिडे वाडा या ठिकाणी सुरू करून शिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांच्या घरापर्यंत नेण्याचे पवित्र कार्य केले त्या ठिकाणी दुसऱ्या आंतरराष्ट्रीय फेस्टिवलचा “आंतरराष्ट्रीय काव्य जागर’ दिनांक २, ३, ४,५ जानेवारी रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे. क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या उत्तुंग कार्यकर्तृत्वाचा प्रचार प्रसार व भारतीय संविधानाविषयी जनजागृती करण्याच्या उदात्त हेतूने या फेस्टिवलची यशस्वी वाटचाल चालू आहे. या कार्यक्रमासाठी पाथर्डी तालुक्यातील चितळी येथील ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार कविवर्य बाळासाहेब कोठुळे यांच्या कवितेची निवड झाली असून दिनांक ५ जानेवारी रोजी होणाऱ्या काव्य जागर अभियानामध्ये त्यांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील कवितेची निवड झाली असून या मंचाचे अध्यक्ष म्हणून त्यांना संयोजन समितीने निवडले असून तसे लेखी पत्र पाठवून कळवण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी साहित्यप्रेमी, समतावादी विचारांच्या सर्व रसिकांनी या कार्यक्रमासाठी सहभागी व्हावे असे आवाहन संयोजन समितीने कळविले. या ठिकाणी चहा, नाश्ता ,व स्वादिष्ट भोजनाची मोफत व्यवस्था कार्यक्रम स्थळी करण्यात आली आहे. प्रत्येक कवी व कवयित्री या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल मध्ये अध्यक्ष असणार आहेत. अशाप्रकारे एकाच कार्यक्रमाची शेकडो अध्यक्ष असणे ही समतावादी विचारधाऱ्याची साक्ष आहे ही ऐतिहासिक घटना म्हणावी लागेल.
कविवर्य बाळासाहेब कोठुळे यांच्या या निवडीबद्दल द. युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष अन्सार शेख, एकता फाउंडेशनचे अध्यक्ष अनंत कराड, कवी राजेंद्र उदारे, आत्माराम शेवाळे, मोहनीराज होन, बाळासाहेब मुनतोडे, गोरक्षनाथ पवार, डॉक्टर बेनझीर शेख, रूपचंद शिदोरे, बाळासाहेब देशमुख कारभारी शिंदे, नंदकिशोर औटी, दादा पाटील राजळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजधर टेमकर, प्राध्यापक तांबोळी सर, डॉक्टर सुभाष देशमुख यांनी त्यांचे अभिनंदन केले







