Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

सातपुडा विद्यालयास महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून लेझीम संच प्रदान

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
December 9, 2025
in शैक्षणिक
0

तालुका प्रतिनिधी : राहुल जयकर

नायगाव : सातपुडा माध्यमिक विद्यालय, नायगाव येथे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी लेझीम संचाचे वाटप करण्यात आले. पारंपरिक क्रीडा आणि सांस्कृतिक वारसा जपणे तसेच विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती व एकात्मता वृद्धिंगत करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.

या कार्यक्रमाला महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष कल्पेश पवार, रुपेश तेली व पंकज कोळी हे मान्यवर उपस्थित होते. लेझीम संच स्वीकारताना शाळेचे मुख्याध्यापक श्री. योगराज नायडे, उपशिक्षक श्री. विकास सूर्यवंशी, श्री. पी. व्ही. बोबडे, श्री. मनोज मोरे, तडवी सर तसेच सर्व शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मान्यवरांनी विद्यार्थ्यांना पारंपरिक खेळांचे महत्त्व, शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी नियमित व्यायामाची गरज आणि संस्कृती जपण्याचे मूल्य याबद्दल मार्गदर्शन केले. लेझीम संच मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून या संचाचा उपयोग शाळेतील दिंडी, रॅली, क्रीडा स्पर्धा तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये केला जाणार आहे.

भविष्यातही विद्यार्थी सेनेतर्फे अशा अनेक उपयुक्त आणि विद्यार्थीहिताच्या उपक्रमांचे आयोजन सातत्याने करण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष कल्पेश पवार यांनी सांगितले.

Previous Post

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान तथा आरे वनपरिमंडळातील राखीव वनात प्रचंड घोटाळा?

Next Post

यावल तालुक्यात पँथर सेनेचे नवे तालुका अध्यक्ष म्हणून सतीश अळकमोल यांची नियुक्ती

Next Post

यावल तालुक्यात पँथर सेनेचे नवे तालुका अध्यक्ष म्हणून सतीश अळकमोल यांची नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ .बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी श्री .विलास नाना साळवे यांची निवड

March 2, 2026

पारंपरिक वाद्य कालबाहय वादकांवर उपासमारीची वेळ…? तुतारी वाद्य नामशेष होण्याच्या मार्गावर..

March 2, 2026

मध्यपूर्वेत तणाव वाढला; भारत सरकारकडून सुरक्षा ॲडव्हायझरीमहाराष्ट्रातील नागरिकांनाही सतर्कतेचे आवाहन

March 1, 2026

धनंजय मुंडेंच्या केसाला धक्का लागला तरी खेळ खल्लास; आमदार सुरेश धससह जरांगेंना मुंडेंच्या समर्थकाची खुलेआम धमकी

March 1, 2026

आश्रम शाळा मगरूळ येथे गंभीर अनियमितता; विद्यार्थी अनुपस्थित, मुख्याध्यापक गैरहजर

March 1, 2026

‘दैनिक हॅलो बातमीदार’च्या दणक्याने कोरपावलीतील बोगस डॉक्टरचे धाबे दणाणले; प्रशासनाकडून अखेर नोटीस!

March 1, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..