Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

जामनेर येथे सोना पेट्रोल पंप समोरील अंबिका ॲटो गॅरेज ला भिषण आग.!आग्नीशामण दलाच्या तत्परतेने आग आटोक्यात आणली.

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
December 5, 2025
in ताज्या बातम्या
0

(प्रतिनिधी:अमोल खरात)

जामनेर: शहरातील सोना पेट्रोल पंपासमोर असलेल्या अंबिका गॅरेजमध्ये आज रात्री अचानक भीषण आग लागली. काही क्षणांतच आगीने प्रचंड रौद्ररूप धारण केले आणि गॅरेजमधील साहित्य, वाहनांचे पार्टस, तेलकट माल उंच ज्वाळांनी पेट घेऊन जळून खाक झाले.

आगीच्या प्रचंड धुराचे लोट आकाशात झेपावताच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. दुकानांचे शटर वितळून पडण्याइतकी आग भयंकर होती.
घटनेची माहिती मिळताच जामनेर नगरपालिका अग्निशामण दल, तसेच स्थानिक तरुणांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले.

काही काळाच्या अथक प्रयत्नानंतर अखेर आग यशस्वीरित्या आटोक्यात आणण्यात आली असून, मोठा अनर्थ टळला आहे.
सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नसून मोठ्या प्रमाणात मालाचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळते.

आग नेमकी कशी लागली? याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलिस व अग्निशमन दलाने याबाबत तपास सुरू केला आहे.

या आगीत अंबिका गॅरेजचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

Previous Post

अन्यथा आमचा एक एक पदाधिकारी आत्मदहन करेल – करूणा मुंडे

Next Post

रावेर गुन्हे शोध पथकाची धडाकेबाज कामगिरी; सोनसाखळी चोरीचे दोन गुन्हे उघड, दोघे सराईत चोर जेरबंद

Next Post

रावेर गुन्हे शोध पथकाची धडाकेबाज कामगिरी; सोनसाखळी चोरीचे दोन गुन्हे उघड, दोघे सराईत चोर जेरबंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

साकळी ग्रामपंचायतीच्या खर्चावर संशयाचे सावट!डसबिन वाटपाच्या नावाखाली नेमका कुठून झाला खर्च? माजी सदस्य सैय्यद तैय्यब सैय्यद ताहेर यांचा जाब

January 15, 2026

जळगाव मनपा रणसंग्राम: राजकीय दबावाला न जुमानता ‘स्वराज्य शक्ती सेने’चे १० निष्ठावंत शिलेदार मैदानात

January 14, 2026

ज्योती विद्या मंदिर सांगवी बुद्रुक येथे राष्ट्रीय युवा दिनानिमित्त धावण्याची स्पर्धा

January 14, 2026

साकळीत घाणीचे साम्राज्य!गावातील गटारी तुंबल्या, दुर्गंधीने नागरिक त्रस्तग्रामपंचायत प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष आरोग्य धोक्यात

January 14, 2026

मतदानापूर्वीच अजित पवारांना दणका, राजकीय सल्लगाराच्या कार्यालयावर छापा

January 14, 2026

साकळीतील अंगणवाडीत मुलांच्या पोषण आहारात आळी!प्रशासनाचा ढिसाळ कारभार ठेकेदार, सेविका व मदतनीसांवर कठोर कारवाईची मागणीअन्यथा तीव्र आंदोलन छेडणार

January 14, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..