
पाचोरा प्रतिनिधी शेख जावीद
आरिफखान इब्राहिम खान हे मौजे नगरदेवळा ता. पाचोरा येथील रहीवासी असुन त्यांची नगरदेवळा शिवारात गट नं. १५ / १ / अ व गट नं. १५ / १ / ब ही शेत मिळकत त्यांच्या व कुटुंबाच्या इतर सदस्यांच्या नावावर आहे. त्यांच्या गटाच्या पश्चिमेस गडद नदी असुन ती दक्षिणेकडुन उत्तरेकडे वाहते गेल्या ४ ते ५ वर्षापासुन सततच्या पावासामुळे गडद नदीला अनेक वेळा महापुर आले व गडद नदीचे संपुर्ण पाण्याचा दबाव माइया शेताकडे आहे. त्यामुळे चालु वर्षी २२ सप्टेंबर रोजी गडद नदीला मोठा महापुर आला व वर नमुद केलेली शेत मिळकती हया गडद नदीच्या महापुरामध्ये पश्चिमेकडील अंदाजे १५ फुट रूंद सरळ २०० मिटर लांबी अशी शेत जमिन खरडुन वाहुन गेल्यामुळे आरिफखान इब्राहिम खान यांचे कधीही न भरूण निघणारे असे नुकसान झाल्यामुळे त्यांच्या शेत जमीनीच्या पश्चिम बाजुस अंदाजे २०० मिटर लांब व कमीत कमी ४ ते ५ फुट उंचीची सरंक्षण भिंत बांधुन दयावी जेणे करून त्यांचे व त्यांच्या कुटुंबाचे शेतीचे नुकसान होणार नाही यापुर्वी सुध्दा त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे शेत मिळकतीच्या दक्षिणेकडील व पश्चिमेकडील संरक्षण भिंत व पिचींग करुन देण्यात यावा असा अर्ज दिला आहे. त्यावेळेस त्यांच्या शेत मिळकतीच्या दक्षिणेकडील भिंत निधीच्या अभावे अपुर्ण मजकुर केला गेला व तसा १० सप्टेंबर २०१२ रोजी २० ते ३० मिटर लांबचे वाढीव प्रस्तावित करण्यात येईल असे पत्र आ.न.बांध / पीओ २/ आरआर/९४/२०१२ कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग जिल्हा परिषद जळगांव यांनी दिले होते. परंतु अदयाप सदर भिंतीचे काम पुर्ण केले नाही ते जर झाले असते तर शेत मिळकतीचे होणारे नुकसान टळले असते दरवर्षी होणाऱ्या अतिवृष्टिमुळे शेतकऱ्याच्या शेताचे मोठया प्रमाणात अतोनात नुकसान होत आहे शेतकऱ्याची शेती पडीत पडत असुन त्यांचा मुळ व्यवसाय शेती असुन त्यांचे संपुर्ण कुटुंब शेतीवरच अवलंबुन आहे २२ सप्टेंबर २०२५ च्या महापुरामध्ये दोन विहीरी हया बुजुन गेल्या त्यात इले मोटारी चा पंप यांचे संपुर्ण नुकसान झाले पिडित शेतकऱ्याच्या शेताच्या पश्चिमेकडील सरंक्षण भिंत व त्यावर पिंचींग लवकरात लवकर बांधण्यात यावी यापुर्वी सन २०११ मध्ये सरंक्षण भिंतीचे पुर्णपणे बांधकाम झाले असते तर शेतकऱ्याचे नुकसान झाले नसते वरील तक्रारी चार विचार करून लवकरात लवकर भिंत बांधुन न्याय दयावा अशा आषयाची मागणी पिडित शेतकरी अरिफखान इब्राहिमखान यांनी निवेदनाद्वारे प्रशासनास केली आहे निवेदनाच्या प्रति राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री गिरिष महाजन, पाचोरा मतदार संघाचे आ. किशोर पाटील जिल्हाधिकारी (जळगाव), सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता, गटविकास अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.







