
संपूर्ण महाराष्ट्रात सध्या भीषण ओल्या दुष्काळाचे संकट निर्माण झाले असून, राज्यातील शेतकऱ्यांची उभी पिके पाण्यात वाहून गेली आहेत. शेतजमिनीवर उदासीचे सावट पसरले असून कर्जबाजारीपणा, अन्नद्रव्यांची टंचाई आणि उद्ध्वस्त स्वप्नांमुळे शेतकरी वर्ग हतबल झाला आहे. या कठीण काळात शेतकरी व सर्वसामान्य जनतेला आधार देणे, त्यांच्यात संघर्षाची नवी ऊर्जा निर्माण करणे हीच खरी समाजकारणाची जबाबदारी आहे.
या भावनेतून पुणे शहरात माता सच्चीयाय कुलदैवतेची भक्तिभावाने आम आदमी पार्टीच्या वतीने आरती मोठ्या श्रद्धा आणि उत्साहात पार पडली.
ही आरती फक्त धार्मिक नव्हती, तर तिच्यामागे ठोस सामाजिक संदेश दडलेला होता. भक्तिमय वातावरणातून जनतेत एकतेचा व संघर्षाचा संदेश पोहोचवणे, शेतकऱ्यांच्या वेदना कमी करण्यासाठी सर्वांना एकत्र आणणे आणि महाराष्ट्रातील जनतेच्या सुख-समृद्धीसाठी सामूहिक प्रार्थना करणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.
या आरतीचे प्रमुख आयोजक गौरव दुग्गड सहपरिवार व गीतांजली जाधव संस्थापक अध्यक्ष, सत्या फाउंडेशन, आप शहराध्यक्ष प्रशांत कांबळे सामाजिक न्याय विभाग यांनी केले होते. या प्रसंगी आरतीचा मान आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र राज्य कार्यकारी अध्यक्ष अजित फटके पाटील, राज्य सचिव अभिजीत मोरे, राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत, पुणे शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे, महिला शहराध्यक्षा सुरेखा भोसले, आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यकर्त्यांच्या, नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे वातावरण अधिक भावनिक व ऊर्जावान झाले.
आम्हाला ठाम विश्वास आहे की
शेतकऱ्यांचे दु:ख हे केवळ शेतकऱ्यांचे नाही, तर संपूर्ण समाजाचे दु:ख आहे.
जनतेच्या प्रत्येक प्रश्नावर आवाज उठवणे, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी झटणे आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहणे हीच खरी राजकारणाची दिशा आहे.
या आरतीच्या माध्यमातून पक्षाने पुन्हा एकदा जाहीर केले की तो सदैव जनतेच्या हक्कासाठी आणि संघर्षासाठी कटिबद्ध राहणार आहे.
या कार्यक्रमाला दुग्गड परिवार कडून प्रमोद दुग्गड, प्रविण दुग्गड, तेजस दुग्गड, आप पदाधिकारी अनिकेत शिंदे, सुनील सौदी, अविनाश भाकरे, निलेश वांजळे, अक्षय शिंदे, ऍड. महादेव कापरे, ऍड. गणेश थरकुडे, कुमार धोगडे, अभिजित जगदाळे, निखिल खंदारे, सुभाष कारंडे, नौशाद अन्सारी यांच्यासह अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.







