
हॅलो बातमीदार –
राहुरी तालुका । प्रविण पाळंदे
अहिल्यानगर जिल्ह्यामधील राहुरी श्रीरामपूर मतदारसंघांमध्ये असणाऱ्या देवळाली प्रवरा शहरातील श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय मध्ये सण 2002 मध्ये इयत्ता दहावी मध्ये शिक्षण घेणाऱ्या माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचा स्नेह मेळावा नुकताच उत्साहात शाळेमध्ये पार पडला
सदर कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी शितल मुसमाडे .सचिन रणधीर .सुजाता वारुळे .महेश गडाख.सोमनाथ मुसमाडे .प्रशांत चव्हाण .अमजद शेख आदी विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले .
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे प्राचार्य श्री .कडू सर उपस्थित होते
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश गडाख यांनी केले यावेळी दादासाहेब वाळुंज यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन रणधीर यांनी केले तर आभार प्रदर्शन मीराताई मोरे यांनी मानले .
यावेळी सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आपल्या शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला .







