
बीड: /प्रशांत बाफना जिल्ह्यातील गहिनीनाथ गडावर आमदार सुरेश धस आणि धनंजय मुंडे एकाच व्यासपीठावर शेजारी शेजारी दिसून आलं. दोघांचा एमेकांशी मनमोकळा संवाद साधतानाचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. आता, याप्रकरणी आमदार सुरेश धस म्हणाले की, धस -मुंडे संघर्ष अजून संपलेला नाही. संघर्ष सुरू राहील पण बाकीच्या ठिकाणी, हे अध्यात्माचे स्टेज आहे. इथे नो राजकारण , इथून रोडवर गेल्यावर राजकारण सुरू होईल असंही धस म्हणाले.श्री गहिनिथ गडाच्या नारळी सप्ताह निमित्त आमदारा धनंजय मुंडे यांनी देखील आपल्या भाषणात सुरेश धस यांचा उल्लेख केला. त्यामुळे बीड जिल्ह्यात मुंडे-धस यांच्यातला हा सुप्त संघर्ष मिटला का? असा प्रश्न प्रत्येकाला पडावा असेच चित्र आज पाहायला मिळाले. परंतु मुंडे -धस हा संघर्ष संपला नसल्याचं सरेश धस यांनी ठामपणे सागितल
बीड जिल्ह्यातील गहिनीनाथ गडावर आज नारळी साप्तहानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. त्यामुळे जिल्ह्यातील भाजप आणि महायुतीचे नेते देखील कार्यक्रमस्थळी होते. याच कार्यक्रमात आमदार सुरेश धस आणि आमदार धनंजय मुंडे शेजारी शेजारी बसल्याचं दिसून आलं. दोघांमध्ये गप्पाही रंगल्याचं पाहालया मिळालं. त्यावमुळे गेल्या काही महिन्यांपासून धस आणि मुंडे यांच्यातील संघर्ष संपल्याच्या भावना स्थानिकांमध्ये निर्माण झाल्या. कारण बीडमधील दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणानंतर आमदार सुरेश धस यांनी हे प्रकरण लावून धरले होते. त्यामध्ये धनंजय मुंडेच्या राजीनाम्याची मागणीही त्यांनी सातत्याने केली होती. त्यामुळे धस आणि मुंडे यांच्यात राजकीय तणाव आणि संघर्ष वाढल्याचं दिसून आलं, मात्र नारळी साप्ताहाच्या निमित्ताने दोन्ही नेते आज एकत्र होते.
धस म्हणाले की, येथील व्यासपीठावर धनंजय मुंडे यांच्यासोबत माझी चर्चा झाली नाही. ते पाहुणे म्हणून आल्यानंतर बोलण कांम होतं. स्टेजवर लगेच भांडण करायचं का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तर, मस्साजोग येथील ग्रामपंचायत निवडणुक बिनविरोध होईल असं सुरेश धस म्हणाले. धनंजय देशमुख आणि ग्रामस्थांनी विनंती केली. लोकशाहीत एखाद्याला नविडणुक लढवावी वाटते, आणखी माघार घ्यायची वेळ गेलेली नाही, निवडणुक बिनविरोध करण्यासाइी सर्वजण प्रयत्न करत असल्याचंही धस यावेळी म्हणाले.







