Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

गाळमुक्त धरणांमुळे शिवाराला नवे जीवन!आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या पुढाकाराने शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
March 28, 2026
in शासकीय
0

उपसंपादक : मिलिंद जंजाळे | रावेर-यावल प्रतिनिधी
रावेर-यावल मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक आणि भविष्यात शेतीला बळ देणारा महत्त्वाचा निर्णय घेत, आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या पुढाकारातून सन २०२६-२७ साठी ‘गाळमुक्त धरण – गाळयुक्त शिवार’ योजना वेगाने राबविण्याचे निश्चित झाले आहे. फैजपूर येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत या योजनेला गती देण्याचे ठोस निर्देश देण्यात आले.
या बैठकीत मतदारसंघातील मध्यम व लघु प्रकल्प, पाझर तलाव, सिमेंट नाला बंधारे तसेच उथळ नाल्यांमध्ये साचलेल्या गाळाच्या उपशाच्या कामांचा सखोल आढावा घेण्यात आला. अनेक वर्षांपासून जलस्त्रोतांमध्ये साचलेला गाळ काढून टाकल्यास पाणीसाठा वाढणार असून भूजल पातळीतही मोठी सुधारणा होणार आहे. यामुळे भविष्यातील पाणीटंचाईवर मोठा दिलासा मिळणार आहे.
विशेष म्हणजे, हा गाळ शेतकऱ्यांना पूर्णपणे विनामूल्य मिळणार असून त्यांनी तो स्वखर्चाने आपल्या शेतात नेऊन जमिनीची सुपीकता वाढवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. गाळामुळे जमिनीची पोत सुधारून उत्पादनात वाढ होणार असल्याने ही योजना शेतकऱ्यांसाठी ‘दुहेरी फायदा’ देणारी ठरणार आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी, फैजपूर तसेच संबंधित विभागाकडे तात्काळ अर्ज सादर करावेत. अर्ज प्राप्त होताच त्वरित परवानगी दिली जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावल तालुक्यातील शेतकऱ्यांनी नायब तहसीलदार अतुल गांगुर्डे (मो. ९८८१२९००४), तर रावेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी नायब तहसीलदार संजय तायडे (मो. ९८२३९७७५९३) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या महत्त्वपूर्ण बैठकीस उपविभागीय अधिकारी, यावल व रावेरचे तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, सिंचन विभाग, वनविभागाचे अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.
शेतकऱ्यांसाठी मोठी संधी – गाळ घ्या, शेती समृद्ध करा!

Previous Post

सोलर पंप योजनेच्या नावाखाली घोटाळा; नगरमध्ये ३८ शेतकर्‍यांची लाखोंची फसवणूक बनावट ग्राहक नंबरचा वापर | आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गाळमुक्त धरणांमुळे शिवाराला नवे जीवन!आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या पुढाकाराने शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी

March 28, 2026

सोलर पंप योजनेच्या नावाखाली घोटाळा; नगरमध्ये ३८ शेतकर्‍यांची लाखोंची फसवणूक बनावट ग्राहक नंबरचा वापर | आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

March 27, 2026

मंत्री पंकजा मुंडे यांच मोठं वक्तव्य गडावरुन भावनिक साद म्हणाल्या ; राजकारण संपल्यावर मी…

March 27, 2026

वनविभागाचा सापळा यशस्वी; 15 लाखांचा डिंक जप्त, अवैध गोडाऊन उघड

March 27, 2026

साकळीतील ईद मिलाद सोहळा ठरला एकात्मतेचा संदेश देणारा!मेश ऍग्रो संचालकांकडून वडिलांचा सामाजिक वारसा जपला जातोय

March 27, 2026

भोंदू खरातचा पुण्याच्या उद्योगपतील कोट्यावधींना गंडा

March 27, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..