Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

धुळे जिल्ह्यात ‘बोगस’ डॉक्टरांना आरोग्य विभागाचेच अभय? तक्रारदार महिला पत्रकारावर जीवघेणा हल्ला करण्याचा कट!

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
March 24, 2026
in आरोग्य, क्राईम
0

धुळे/साक्री प्रतिनिधी -धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील म्हसदी गावात एका बंगाली बोगस डॉक्टरच्या विरोधात तक्रार करणे एका महिला पत्रकाराच्या जीवावर बेतल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून या प्रकरणावर सोयीस्कर डोळेझाक करणाऱ्या साक्री तालुका आरोग्य प्रशासनाचे आणि बोगस डॉक्टरांचे अर्थपूर्ण ‘साठेलोटे’ आता चव्हाट्यावर आले असून, निर्भीड पत्रकार प्राजक्ता तायडे यांनी आवाज उठवला असता त्यांना चक्क ३० ते ४० गुंडांच्या गराड्यात ढकलून त्यांचा जीव धोक्यात घालण्याचा संतापजनक प्रकार घडला आहे.

या प्रकरणातील धक्कादायक वास्तव असे की, पत्रकार प्राजक्ता तायडे यांनी दोन महिन्यांपूर्वीच धुळे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे या बोगस डॉक्टरविरुद्ध पुराव्यासह तक्रार दिली होती. जिल्हा स्तरावरून हे प्रकरण साक्री तालुका आरोग्य अधिकारी T.H.O गायकवाड यांच्याकडे पुढील कारवाईसाठी सोपवण्यात आले. मात्र, दोन महिने या अर्जावर कारवाईचे केवळ नाटक करण्यात आले. वारंवार फोन करून विचारणा केली असता गायकवाड यांनी उडवाउडवीची उत्तरे देत प्रकरणाची सोयीस्करपणे ‘चालढकल’ केली. अखेर दोन महिन्यांच्या अखेरीस कारवाईचा बनाव रचून गायकवाड यांनी तायडे यांना जळगाववरून बोलावून घेतले आणि म्हसदी गावात तब्बल ३ ते ४ तास ताटकळत ठेवले.

​या विलंबामागील भयानक सत्य आता समोर आले आहे; कारवाईच्या नावाखाली तक्रारदाराला बाहेर थांबवून बोगस डॉक्टरला आपला दवाखाना, सर्व बेड आणि औषधे रिकामी करण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात आला. इतकेच नव्हे तर, “मी पोलीस प्रोटेक्शन बोलावतो, तुम्ही या” असे खोटे आश्वासन देणाऱ्या गायकवाड यांनी जाणीवपूर्वक पोलिसांना बोलावले नाही. तक्रारदार महिला पत्रकार घटनास्थळी पोहोचताच तिथे आधीच दबा धरून बसलेल्या ३० ते ४० भाडोत्री गुंडांनी त्यांना घेराव घातला आणि मारहाणीचा प्रयत्न केला. एका महिला पत्रकाराला संरक्षण देण्याऐवजी त्यांना अशा प्रकारे गुंडांच्या हवाली करणे, हा केवळ कर्तव्यात कसूर नसून एका मोठ्या कटाचा भाग असल्याचे दिसून येत आहे.

​या सर्व संतापजनक प्रकाराचे चित्रण प्राजक्ता तायडे यांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केले आहे, ज्यातून प्रशासकीय अधिकारी आणि बोगस डॉक्टर यांच्यातील ‘मिलीभगत’ स्पष्टपणे उघड झाली आहे. जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांना वाचवण्यासाठी प्रशासकीय खुर्चीचा असा गैरवापर होणे हे जिल्ह्यासाठी लाजीरवाणे आहे.

​आता या प्रकरणावर जिल्हा आरोग्य अधिकारी काय ॲक्शन घेणार? की भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घातले जाणार? हा प्रश्न उपस्थित होत आहे. जर या प्रकरणातील दोषींवर आणि त्या बोगस डॉक्टरवर तात्काळ कठोर कारवाई झाली नाही, तर पत्रकार प्राजक्ता तायडे यांना संवैधानिक मार्गाने उपोषणाला बसावे लागणार असून, त्यानंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल.

Previous Post

नगरपालिकेचा नगर शहारातील कर्मचारी लाच घेताना अटक

Next Post

यावल पोलिसांची धडक कारवाई : रात्रीच्या काँबिंगमध्ये गुन्हेगारांवर कडक प्रहार

Next Post

यावल पोलिसांची धडक कारवाई : रात्रीच्या काँबिंगमध्ये गुन्हेगारांवर कडक प्रहार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आयपीएल क्रिकेट सट्टेबाजीत सोनईच्या ‘त्या’ तरुणाची १० लाखांची फसवणूक…? मार्गदर्शनाअभावी ना दाद ना फिर्याद…! स्थानिक पोलिसांच्या प्रबोधनाची नितांत आवश्यकता

May 20, 2026

आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर मारूळ गावात पोलीस प्रशासनाची महत्त्वपूर्ण बैठक

May 20, 2026

आयपीएल सट्टेबाजीचं सोनई – शनिशिंगणापूर ‘कनेक्शन’…? अहिल्यानगर एसपींचं ‘सुदर्शन’ चक्र भेदणार का? दिवसभरात होतेय लाखोंची उलाढाल…!

May 20, 2026

बोगस कुणबी प्रमाणपत्रं रद्द होणार? मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर हालचालींना वेग,

May 19, 2026

पाथर्डीत स्त्री बिनटाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर यशस्वीसात शिबिरांत 154 हून अधिक महिलांवर यशस्वी शस्त्रक्रिया

May 19, 2026

शिर्डीत तोफगोळा उत्पादन प्रकल्प; जिल्ह्यात संरक्षण उत्पादन क्षेत्राला मोठी चालना!

May 19, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..