Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

यावल पूर्व वनपरिक्षेत्रात अवैध वृक्षतोडीचा आरोप; चौकशीची मागणी

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
March 16, 2026
in क्राईम
0

तालुका प्रतिनिधी :- राहुल जयकर

यावल तालुक्यातील यावल पूर्व वनपरिक्षेत्राच्या हद्दीत अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. काही व्यक्तींमार्फत दिवसाढवळ्या तसेच रात्रीच्या वेळी झाडांची कत्तल करून लाकडाची वाहतूक केली जात असल्याचे स्थानिकांकडून सांगितले जात आहे.

या प्रकारामुळे परिसरातील वनसंपत्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून पर्यावरणाला धोका निर्माण झाल्याची चिंता व्यक्त होत आहे. संबंधित विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप ठोस कारवाई होत नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

दरम्यान, या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून अवैध वृक्षतोड करणाऱ्यांवर तसेच त्यांना सहकार्य करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी पर्यावरण संवर्धन व विकास समितीचे जळगाव जिल्हाध्यक्ष तथा शेतकरी संघर्ष संघटना उत्तर महाराष्ट्रचे अध्यक्ष देवेंद्र सुरेखा मधुकर वराडे यांनी केली आहे.

यासंदर्भात त्यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी यावल पूर्व तसेच उपवनसंरक्षक (DCF) जळगाव यांच्याकडे लेखी अर्ज सादर करून चौकशीची मागणी केली आहे. तसेच भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी वन विभागाने संबंधित भागात गस्त वाढवून कठोर उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी करण्यात आली आहे.

Previous Post

सहा वर्षांच्या नौफिलचा छोट्याशा वयात मोठा संकल्प; दोन रोजे पूर्ण करत दिला श्रद्धा-संयमाचा संदेश!

Next Post

साकळी ग्रामपंचायतीचा स्वच्छतेकडे बेफिकीरपणा; सदस्य-पदाधिकारी बनले “मालक”? नागरिकांचा संताप उसळला!

Next Post

साकळी ग्रामपंचायतीचा स्वच्छतेकडे बेफिकीरपणा; सदस्य-पदाधिकारी बनले “मालक”? नागरिकांचा संताप उसळला!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आयपीएल क्रिकेट सट्टेबाजीत सोनईच्या ‘त्या’ तरुणाची १० लाखांची फसवणूक…? मार्गदर्शनाअभावी ना दाद ना फिर्याद…! स्थानिक पोलिसांच्या प्रबोधनाची नितांत आवश्यकता

May 20, 2026

आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर मारूळ गावात पोलीस प्रशासनाची महत्त्वपूर्ण बैठक

May 20, 2026

आयपीएल सट्टेबाजीचं सोनई – शनिशिंगणापूर ‘कनेक्शन’…? अहिल्यानगर एसपींचं ‘सुदर्शन’ चक्र भेदणार का? दिवसभरात होतेय लाखोंची उलाढाल…!

May 20, 2026

बोगस कुणबी प्रमाणपत्रं रद्द होणार? मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर हालचालींना वेग,

May 19, 2026

पाथर्डीत स्त्री बिनटाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर यशस्वीसात शिबिरांत 154 हून अधिक महिलांवर यशस्वी शस्त्रक्रिया

May 19, 2026

शिर्डीत तोफगोळा उत्पादन प्रकल्प; जिल्ह्यात संरक्षण उत्पादन क्षेत्राला मोठी चालना!

May 19, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..