Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

यावल ग्रामीण रुग्णालयातील एक्स-रे मशीन वर्षभरापासून बंद; रुग्णांचे हाल, लोकप्रतिनिधी झोपेत?

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
March 13, 2026
in आरोग्य
0

उपसंपादक :- मिलिंद जंजाळे
यावल येथील ग्रामीण रुग्णालयात गेल्या वर्षभरापासून एक्स-रे मशीन बंद अवस्थेत असल्यामुळे रुग्णांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. अपघातग्रस्त, हाडांचे विकार असलेले तसेच विविध आजारांनी त्रस्त असलेले रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात येतात; मात्र एक्स-रे सुविधा नसल्यामुळे त्यांना खासगी दवाखान्यांकडे धाव घ्यावी लागत असल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
ग्रामीण भागातील सर्वसामान्य आणि गरीब नागरिकांना मोफत व तात्काळ आरोग्य सेवा मिळावी या उद्देशाने शासनाने ग्रामीण रुग्णालये उभारली आहेत. मात्र यावल ग्रामीण रुग्णालयात मूलभूत सुविधा देखील उपलब्ध नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे. वर्षभरापासून एक्स-रे मशीन बंद असूनही त्याची दुरुस्ती किंवा नवीन मशीन उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित प्रशासन किंवा लोकप्रतिनिधींनी ठोस पावले उचलली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
दररोज अनेक रुग्ण उपचारासाठी येत असताना एक्स-रे सुविधा नसल्याने डॉक्टरांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिणामी रुग्णांना चोपडा, जळगाव किंवा खासगी रुग्णालयांमध्ये जावे लागत असल्याने वेळ आणि पैशांचा मोठा अपव्यय होत आहे.
विशेष म्हणजे आरोग्य व्यवस्थेतील या गंभीर समस्येकडे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि आरोग्य प्रशासनाने जणू डोळेझाक केल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. “रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असताना लोकप्रतिनिधी झोपा काढत आहेत का?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
यावलसारख्या मोठ्या तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात वर्षभर एक्स-रे मशीन बंद असणे ही अत्यंत गंभीर बाब असून याची तातडीने दखल घेऊन मशीन सुरू करावी किंवा नवीन मशीन उपलब्ध करून द्यावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा नागरिकांना रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही दिला जात आहे.

Previous Post

चलो मुंबई! कंत्राटी कोरोना योद्ध्यांचा पुन्हा एल्गार; १२ मार्चला मुंबईत न्यायासाठी शक्तीप्रदर्शन

Next Post

संजय गांधी निराधार योजनेतून दिव्यांगांना दरमहा ₹2500; कागदपत्रे 20 मार्चपूर्वी जमा करण्याचे आवाहन

Next Post

संजय गांधी निराधार योजनेतून दिव्यांगांना दरमहा ₹2500; कागदपत्रे 20 मार्चपूर्वी जमा करण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आयपीएल क्रिकेट सट्टेबाजीत सोनईच्या ‘त्या’ तरुणाची १० लाखांची फसवणूक…? मार्गदर्शनाअभावी ना दाद ना फिर्याद…! स्थानिक पोलिसांच्या प्रबोधनाची नितांत आवश्यकता

May 20, 2026

आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर मारूळ गावात पोलीस प्रशासनाची महत्त्वपूर्ण बैठक

May 20, 2026

आयपीएल सट्टेबाजीचं सोनई – शनिशिंगणापूर ‘कनेक्शन’…? अहिल्यानगर एसपींचं ‘सुदर्शन’ चक्र भेदणार का? दिवसभरात होतेय लाखोंची उलाढाल…!

May 20, 2026

बोगस कुणबी प्रमाणपत्रं रद्द होणार? मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर हालचालींना वेग,

May 19, 2026

पाथर्डीत स्त्री बिनटाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर यशस्वीसात शिबिरांत 154 हून अधिक महिलांवर यशस्वी शस्त्रक्रिया

May 19, 2026

शिर्डीत तोफगोळा उत्पादन प्रकल्प; जिल्ह्यात संरक्षण उत्पादन क्षेत्राला मोठी चालना!

May 19, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..