Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

पंचक्रोशीतील आठ महिला सरपंचांचा एल्गारअवैध दारूविक्री व बेकायदेशीर धंद्यांविरोधात शेवगाव पोलीस ठाण्यावर धडक

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
March 6, 2026
in क्राईम
0

अहिल्यानगर/ प्रशांत बाफना
होळी व धुलीवंदन सणाच्या पार्श्वभूमीवर पंचक्रोशीतील गावांमध्ये वाढलेल्या अवैध दारूविक्री व इतर बेकायदेशीर धंद्यांविरोधात आठ महिला सरपंच व महिला प्रशासकांनी आक्रमक भूमिका घेत थेट शेवगाव पोलीस ठाणे येथे धडक दिली.

ग्रामपंचायत नवीन दहिफळ यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आलेल्या निवेदनावर पंचक्रोशीतील आठही महिला सरपंचांचे अधिकृत स्वाक्षऱ्या व शिक्के असून, गावांमध्ये वाढत्या दारूविक्रीमुळे महिला व सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाल्याचे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे.

महिलांचा संताप उफाळला
सणासुदीच्या काळात गावोगावी अवैध दारूची खुलेआम विक्री होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी दारू सेवन करून गोंधळ घालणे, शिवीगाळ करणे, महिलांशी गैरवर्तन करणे तसेच तरुण पिढीला चुकीच्या मार्गावर नेणारे प्रकार वाढत असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनल्याचे महिलांनी नमूद केले.

“गावातील शांतता व महिलांचा सन्मान अबाधित राहिला पाहिजे. अवैध धंदे तात्काळ बंद झाले नाहीत, तर महिला शक्ती रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही,” असा ठाम इशारा महिला सरपंचांनी दिला.

पोलिसांकडे कठोर कारवाईची मागणी
निवेदनात पुढील प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत –

अवैध दारू विक्रेत्यांवर तात्काळ धाड टाकून गुन्हे दाखल करावेत.
सणाच्या काळात गाव परिसरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवावा.
बेकायदेशीर धंदे पूर्णपणे बंद करण्यासाठी सातत्याने कारवाई करावी.
पोलीस प्रशासनाने निवेदन स्वीकारून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र आता संपूर्ण पंचक्रोशीचे लक्ष पोलिसांच्या प्रत्यक्ष कृतीकडे लागले आहे.

“महिला एकत्र आल्या तर अन्याय सहन करणार नाहीत!”
पंचक्रोशीतील महिला सरपंच व प्रशासकांनी दाखवलेली एकजूट ही गावातील अवैध धंद्यांविरोधातील मोठ्या चळवळीची नांदी ठरणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अवैध दारूविक्री तात्काळ थांबली नाही, तर पुढील आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा महिला नेतृत्वाने दिला आहे.

Previous Post

किनगाव ग्रामीण रुग्णालय ‘शोपीस’ ठरले का?  इमारत तयार; डॉक्टर व कर्मचारी मात्र अद्याप नाहीत!जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर व संपूर्ण स्टाफ केव्हा पाठवणार? नागरिकांचा संतप्त सवाल

Next Post

“वीज नाही, पाणी नाही, डॉक्टर नाही… तरी ९ कर्मचाऱ्यांना दोन वर्षे पगार! किनगाव ग्रामीण रुग्णालयात धक्कादायक प्रकार उघड”आठ दिवसांत वीज-पाणी व्यवस्था केल्यास रुग्णालय सुरू करण्याचा दावा  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. स्वप्नील सांगळे

Next Post

“वीज नाही, पाणी नाही, डॉक्टर नाही… तरी ९ कर्मचाऱ्यांना दोन वर्षे पगार! किनगाव ग्रामीण रुग्णालयात धक्कादायक प्रकार उघड”आठ दिवसांत वीज-पाणी व्यवस्था केल्यास रुग्णालय सुरू करण्याचा दावा  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. स्वप्नील सांगळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आयपीएल क्रिकेट सट्टेबाजीत सोनईच्या ‘त्या’ तरुणाची १० लाखांची फसवणूक…? मार्गदर्शनाअभावी ना दाद ना फिर्याद…! स्थानिक पोलिसांच्या प्रबोधनाची नितांत आवश्यकता

May 20, 2026

आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर मारूळ गावात पोलीस प्रशासनाची महत्त्वपूर्ण बैठक

May 20, 2026

आयपीएल सट्टेबाजीचं सोनई – शनिशिंगणापूर ‘कनेक्शन’…? अहिल्यानगर एसपींचं ‘सुदर्शन’ चक्र भेदणार का? दिवसभरात होतेय लाखोंची उलाढाल…!

May 20, 2026

बोगस कुणबी प्रमाणपत्रं रद्द होणार? मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर हालचालींना वेग,

May 19, 2026

पाथर्डीत स्त्री बिनटाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर यशस्वीसात शिबिरांत 154 हून अधिक महिलांवर यशस्वी शस्त्रक्रिया

May 19, 2026

शिर्डीत तोफगोळा उत्पादन प्रकल्प; जिल्ह्यात संरक्षण उत्पादन क्षेत्राला मोठी चालना!

May 19, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..