Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

मराठीचा अपमान खपवून घेणार नाही : मनविसेचा विद्यापीठ प्रशासनाला कडक इशारा

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
February 5, 2026
in राजकीय
0

तालुका प्रतिनिधी : राहुल जयकर

दि. ५ फेब्रुवारी २०२६
कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने प्रसिद्ध केलेले परिपत्रक क्र. २/२०२६ (दि. ०७/०१/२०२६) तसेच अध्यादेश क्र. १३४ हे केवळ इंग्रजी भाषेत प्रसिद्ध केल्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे.
यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या शिष्टमंडळाने संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ प्रा. श्री. योगेश पाटील यांची भेट घेऊन निवेदन सादर केले व मराठी भाषेच्या अवमानाविरोधात ठाम भूमिका मांडली.
महाराष्ट्र हे मराठी भाषेचे राज्य असताना, उत्तर महाराष्ट्रातील हजारो ग्रामीण, आदिवासी व सामान्य विद्यार्थ्यांशी थेट संबंधित नियम व अध्यादेश इंग्रजी भाषेत काढणे म्हणजे मराठी विद्यार्थ्यांवर जाणीवपूर्वक अन्याय असून हा मराठी भाषेचा थेट अपमान असल्याचा आरोप मनविसेने केला आहे.
इंग्रजीत प्रसिद्ध केलेले नियम बहुसंख्य विद्यार्थ्यांना समजत नसल्याने त्यांच्या शैक्षणिक हक्कांवर गदा येत आहे. हा प्रकार मनसे कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नसून, गरज पडल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा कडक इशारा यावेळी देण्यात आला.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या ठाम मागण्या :
१) परिपत्रक क्र. २/२०२६ व अध्यादेश क्र. १३४ यांची अधिकृत मराठी आवृत्ती तात्काळ प्रसिद्ध करावी.
२)यापुढे विद्यापीठातील सर्व परिपत्रके, अध्यादेश व अधिकृत पत्रव्यवहार मराठी भाषेतच काढावेत.
३)विद्यार्थ्यांना सहज समजेल, अशा सोप्या व स्पष्ट मराठी भाषेचा वापर करावा.
या मागण्यांवर तात्काळ सकारात्मक निर्णय न झाल्यास, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आंदोलनाचा मार्ग स्वीकारेल, याची नोंद विद्यापीठ प्रशासनाने घ्यावी, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
यावेळी
कल्पेश राजेंद्र पवार
जिल्हाध्यक्ष – रावेर लोकसभा
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, जळगाव,श्रीकृष्ण मेंगडे (जळगाव उपशहर अध्यक्ष, मनसे),ललित शर्मा, प्रकाश जोशी, उदय पाटील
तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

मराठी माणसाचा व मराठी विद्यार्थ्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सदैव रस्त्यावर उतरणार आहे, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

Previous Post

साने गुरुजी विद्यालयाचे जुने गेट सुरू करण्याची नगरसेवक विजय चौधरी यांची मागणी अन्यथा आंदोलनाचा इशारा

Next Post

अतिक्रमणधारकांनी घेतला आयुक्तांचा धसका दुसर्‍या दिवशी माळीवाडा, एसटी स्टँड परिसरातील अतिक्रमणे हटवली

Next Post

अतिक्रमणधारकांनी घेतला आयुक्तांचा धसका दुसर्‍या दिवशी माळीवाडा, एसटी स्टँड परिसरातील अतिक्रमणे हटवली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

किनगाव आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा; दोन गरोदर मातांना एकाच बेडवर उपचार! प्रशासन झोपेत?

March 25, 2026

रावेर–यावल तालुक्यात भोंदू बाबा अशोक खरातचे ‘कनेक्शन’ ? अधिकाऱ्यांपासून नागरिकांपर्यंत चर्चेला उधाण

March 25, 2026

अवैध वृक्षतोडीला पाठीशी कोण? यावलमध्ये आंदोलनाची घोषणा

March 24, 2026

परसाळे बुद्रुक येथे १२ एप्रिल रोजी आदिवासी तडवी भिल्ल समाजाचा सामूहिक विवाह आयोजन

March 24, 2026

यावल पोलिसांची धडक कारवाई : रात्रीच्या काँबिंगमध्ये गुन्हेगारांवर कडक प्रहार

March 24, 2026

धुळे जिल्ह्यात ‘बोगस’ डॉक्टरांना आरोग्य विभागाचेच अभय? तक्रारदार महिला पत्रकारावर जीवघेणा हल्ला करण्याचा कट!

March 24, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..