Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

रावेर गुन्हे शोध पथकाची धडाकेबाज कारवाई अट्टल दुचाकी चोरट्यांना अटक; 13 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
February 2, 2026
in क्राईम
0

रावेर तालुका( प्रतिनिधी आदित्य गजरे) :

रावेर गुन्हे शोध पथकाने अट्टल दुचाकी चोरट्यांविरोधात मोठी कारवाई करत तीन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून 13 लाख 10 हजार रुपये किमतीच्या 09 महागड्या मोटारसायकलींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे रावेर तालुक्यासह परिसरात मोठे समाधान व्यक्त करण्यात येत आहे.दि. 20 डिसेंबर 2025 रोजी रावेर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 500/2025, भा.न्या.सं. कलम 303(2) अन्वये रॉयल एनफिल्ड बुलेट चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. फिर्यादी हे जळगाव येथून रावेर शहरातील चौराहा भागात नातेवाईकांकडे आले असता त्यांनी त्यांची नवीन पांढऱ्या रंगाची बुलेट घरासमोर उभी केली होती. काही वेळाने अज्ञात चोरट्यांनी सदर दुचाकी चोरून नेल्याचे लक्षात आले.गुन्ह्याच्या तपासात रावेर शहरातील 95 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले. आरोपींनी चेहरा झाकल्यामुळे ओळख पटविण्यात अडचणी येत होत्या. दुचाकी लोटत नेत पुढे जाऊन लॉक तोडून वाहन सुरू करण्याची आरोपींची पद्धत असल्याचे तपासात निष्पन्न झाले.भुसावळ येथेही अशाच प्रकारची दुचाकी चोरी झाल्याची माहिती मिळाल्यानंतर तपासाची दिशा बदलण्यात आली. चोरीस गेलेली बुलेट शिरपूर येथे विकली गेल्याची खात्रीशीर माहिती पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांना मिळाल्यानंतर गुन्हे शोध पथकाने तांत्रिक तपास सुरू केला. चोपडा व यावल तालुक्यात शोधमोहीम राबवून कोरपावली (ता. यावल) येथे आरोपींना ताब्यात घेण्यात आले.अटक करण्यात आलेले आरोपी पुढीलप्रमाणे आहेत १) गौरव दत्तात्रय तायडे (वय 20),२) तौसिफ तय्यब कुलकर्णी,३) अब्दुल रहेमान तैय्यब पटेल (वय 20),सर्व रा. कोरपावली, ता. यावल, जि. जळगाव.पोलिसी चौकशीत आरोपींनी आतापर्यंत 09 मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली असून, त्यामध्ये रॉयल एनफिल्ड (बुलेट), आर-15, सुजुकी बर्गमन, स्प्लेंडर, अ‍ॅक्टिव्हा यांसारख्या महागड्या दुचाकींचा समावेश आहे. काही दुचाकी आरोपींच्या घरातून तर काही एकांतस्थळी लपवून ठेवलेल्या अवस्थेत हस्तगत करण्यात आल्या.
तपासात असेही आढळून आले की आरोपी हे केटरिंगच्या कामानिमित्त गुजरात राज्यातील वडोदरा व इतर शहरांत रेकी करत, दुचाकी चोरी करून महाराष्ट्रात आणत व कोरपावली परिसरात विक्री करत होते. दुचाकी विकल्यानंतर डुप्लिकेट आर.सी. बुक तयार करून देणारे रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता असून त्या दिशेने पुढील तपास सुरू आहे.अटक आरोपींना मा. न्यायालयात हजर केले असता त्यांना 03 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या गुन्ह्यात आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे.ही संपूर्ण कारवाई मा. डॉ. श्री. महेश्वर रेड्डी (पोलीस अधीक्षक, जळगाव), मा. श्री. अशोक नखाते (अप्पर पोलीस अधीक्षक, जळगाव विभाग), मा. श्री. अनिल बडगुजर (उपविभागीय पोलीस अधिकारी, फैजपूर विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
सदर कारवाईत पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल, पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे यांच्यासह गुन्हे शोध पथकातील पो.हे.कॉ. ईश्वर चव्हाण,पो.ना. कल्पेश आमोदकर,पो.शि. प्रमोद पाटील,श्रीकांत चव्हाण,विशाल पाटील,सुकेश तडवी,विकार शेख,तथागत सपकाळे,रुबाब तडवी,गजानन बोने यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पो.ना. कल्पेश आमोदकर करीत आहेत.

Previous Post

नॅशनल व्हॉईस मीडिया फोरमचा मूकनायक पत्रकार वर्धापन दिन व राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा शेगाव येथे उत्साहात साजरा

Next Post

सोनारीत परंपरेनुसार काळभैरव यात्रा उत्साहात पार पडली.

Next Post

सोनारीत परंपरेनुसार काळभैरव यात्रा उत्साहात पार पडली.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अजितदादांच्या विमानात बॉम्ब होता का?, खासदार बजरंग सोनवणेंच्या दाव्याने खळबळ

February 7, 2026

अजितदादांच्या अपघाताचा प्राथमिक अहवाल आला, तांत्रिक बिघाड, लँडिंगचा अँगलच चुकला?

February 7, 2026

यावल तालुका आरोग्य विभागाचा पुढाकार  क्षयरुग्णांना पोषण आहार किटचे वाटप; उपचारासोबत पोषणावरही भर

February 7, 2026

साकळीच्या मातीतून उगवला ‘कृषीसेवक’! प्रगतिशील शेतकरी दीपक महाजन यांचा राज्यस्तरीय सन्मान

February 7, 2026

सियोना उर्फ स्विटीबाळाचा पहिला वाढदिवस स्नेहसदन चर्चमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .

February 7, 2026

कल्याण येथे सिम्बिंयोसिस शाळेत अलियान तडवी आदिवासी विद्यार्थ्याने काठी फिरवून केले जोरदार प्रदर्शन

February 6, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..