Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनी बाबासाहेबांचा अपमान!पालक मंत्री गिरीश महाजन यांनी भाषणात नाव न घेतल्याने महाराष्ट्रभर संतापाची लाट

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
January 26, 2026
in राजकीय
0

“हा केवळ विसर नव्हे, तर संविधानाचा अवमान” – आंबेडकरी संघटनांचा थेट आरोप
राज्यभर जाहीर निषेध, आंदोलनाचा इशारा
उपसंपादक:-मिलिंद जंजाळे
भारताच्या संविधानाचे शिल्पकार, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर उभ्या असलेल्या देशात, प्रजासत्ताक दिनासारख्या पवित्र दिवशीच त्यांचे नाव न घेणे ही गंभीर बाब ठरत असून नाशिक येथे पालक मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या या कृतीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे.
नाशिक येथे आयोजित अधिकृत प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांनी प्रदीर्घ भाषण केले. मात्र, संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव एकदाही न घेता भाषण संपवले. यावर कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांमध्ये, कर्मचारी वर्गात व विशेषतः आंबेडकरी विचारधारेशी संबंधित संघटनांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
“हा अपघात नाही, तर मानसिकता आहे” – आंबेडकरी संघटनांचा आरोप
या घटनेनंतर राज्यभरातील विविध आंबेडकरी संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि संविधानप्रेमी नागरिकांनी मंत्री महाजन यांचा जाहीर निषेध सुरू केला आहे. अनेक ठिकाणी निषेध सभा, घोषणाबाजी आणि निवेदने देण्यात येत आहेत.
संघटनांचे म्हणणे आहे की,
“प्रजासत्ताक दिन म्हणजे संविधानाचा उत्सव! आणि संविधान म्हणजे बाबासाहेब! त्यांचे नाव न घेणे म्हणजे देशाच्या आत्म्याचा अपमान आहे.”
सोशल मीडियावरही संतापाचा उद्रेकही घटना समोर येताच सोशल मीडियावर असे हॅशटॅग ट्रेंड होऊ लागले. हजारो नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया नोंदवत मंत्री महाजन यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी केली आहे.
राज्यभर आंदोलनाचा इशारा
आंबेडकरी संघटनांनी स्पष्ट इशारा दिला आहे की,
जर मंत्री गिरीश महाजन यांनी तात्काळ जाहीर माफी मागितली नाही, तर राज्यव्यापी आंदोलन, रास्ता रोको, निदर्शने आणि तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
राजकीय वर्तुळातही खळबळ
या घटनेमुळे राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली असून विरोधी पक्षांनीही सरकारवर जोरदार टीका केली आहे.
“संविधानाचा सन्मान न करणाऱ्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही,” असा थेट हल्लाबोल करण्यात आला आहे.

Previous Post

सिंहस्थ कुंभमेळा शिर्डीच्या विकासाची पर्वणी ….

Next Post

पिंपळगाव बुद्रूक प्राथमिक विद्या मंदिर शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

Next Post

पिंपळगाव बुद्रूक प्राथमिक विद्या मंदिर शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कल्याण येथे सिम्बिंयोसिस शाळेत अलियान तडवी आदिवासी विद्यार्थ्याने काठी फिरवून केले जोरदार प्रदर्शन

February 6, 2026

जळगाव जिल्ह्यात समता सैनिक दलाची दमदार ताकद उभी पूर्व व पश्चिम अशा दोन जिल्हा कार्यकारिणींची घोषणा; यावल तालुक्यात नव्या नेतृत्वाची निवड

February 6, 2026

पोटच्या मुलीला मारण्याची धमकी देऊन विवाहितेवर लैंगिक अत्याचार पाचोरा तालुक्यातील नराधमा विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल

February 6, 2026

यावल पंचायत समितीत आमदार अमोल जावळे यांची अचानक धडक  गटविकास अधिकारी गैरहजर; अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवर संतापाचा स्फोट!

February 6, 2026

अतिक्रमणधारकांनी घेतला आयुक्तांचा धसका दुसर्‍या दिवशी माळीवाडा, एसटी स्टँड परिसरातील अतिक्रमणे हटवली

February 5, 2026

मराठीचा अपमान खपवून घेणार नाही : मनविसेचा विद्यापीठ प्रशासनाला कडक इशारा

February 5, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..