यावल तालुका प्रतिनिधी :- मिलिंद जंजाळे
एकी कडे आपल्या देशाची सुरक्षाकरण्यासाठी आमचा सैनिक सीमेवर आपल्या जीवाची परवा न करता पूर्ण निष्ठेने आपले जीवन समर्पित करून देशाची सेवा करीत असतो आणि आपल्या देशातील १३० कोटी जनतेचे रक्षण करण्यासाठी उभा राहून देशातील तरुण व सर्व स्थरातील जनतेला एक देशाविषयी स्वाभिमान जगण्यास सांगत असतांना हजारो वीर जवान सैनिकांची अमर गाथा प्रेरणा देतात मात्र यावल तालुक्यात पोलिस प्रशासन हजारो तरुण वर्गाला अवैध धंद्याच्या जाळ्यात अडकवतांना दिसत असून यावल पोलिस प्रशासनाच्या आशीर्वादाने अवैध धंद्यांना सन २०२१ पासून मोठ्या प्रमाणात चालना देत आज हि कायम असल्याचे चित्र दिसत आहे.
यावल तालुक्याचा विचार केला तर तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी व कष्टकरी वर्ग मोठा असल्याने मोलमजुरी करून आपले जीवन जगत आपल्या मुलांना चागल्या दर्ज्याचे शिक्षण देण्यासाठी आई वडील शेतात किवा वाटेल त्या परिस्थितीत कष्ठ करून राबराब राबून आपल्या मुलाबाळांचे स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न करीत असतांना मात्र अवैध धंद्यांच्या काळोख्यात अंधारात जातांना त्यांचे स्वप्न भंग पावतांना दिसतांना याला कारण म्हणजे यावल पोलिस प्रशासनाने अवैध धंद्यांना दिलेली सूट आणि स्वताच्या स्वार्थासाठी इतरांचे जीवन उध्वस्त करीत हप्त्ते खोरी करून तरुण वर्गाला वेसानाधीन बनून सर्रास पणे गावो गावी अवैद्य रित्या गावठी दारू विकण्यास परवानगी देणे सठ्ठा मटका जुगार चालविण्यास परवानगी देणे व सर्व सामान्य कुटुंबाचा नाश करण्यास यावल पोलिस प्रशासनाचा मोठा वाटा दिसून येत असून यावल तालुक्यात अवैध धंद्यांना मोठ्या प्रमाणत चालना सन २०२१ मध्ये यावल पोलिस स्टेशन ला कार्यरत असलेले पोलिस निरीक्षक सुधीर पाटील व उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार,गुप्तखातेचा एक कर्मचारी,व हप्ते जमा करणारा एक पोलिस कर्मचारी यांच्यासह काही बिट हवालदार व कर्मचारी अश्यांनी अवैध धंदे चालवनाऱ्याना मोकळी दिली असतांना त्याचा परिणाम खूप वाईट असा होऊन अनके लोकांचे संसार उध्वस्त झाले आणि आजही होत आहे सन २०२१ मध्ये अवैध बंद करण्यासाठी व जर कोणी व्यक्ती पुढाकार घेत असेल तर त्या व्यक्तीला खोट्या गुन्हान मध्ये अडकून त्याचा बदला घेण्याची भावना अश्या या यावल पोलिस निरीक्षकाच्या सह त्यांच्या साबोत असलेल्या चांडाळ चौकडीची होती आणि तो मार्ग त्यांनी अवलंबविला सुधा असून यावल चोपडा रोड वर विनाकारण नागरिकांना त्रास देण्याच्या हेतूने ट्रोफिक गिरी करणारे पोलिस कर्मचारी यांच्या कडून नागरिकांची लुट केली जात होती तेव्हा एक पत्रकार यांनी या हप्ते खोर पोलिस निरीक्षकाचा व त्याच्या साथीदारांचा खरा चेहरा जनतेसोमोर आणण्यासाठी बातमी प्रसिद्ध केली होती त्याचा या हप्त्ते खोर पोलिसाला व त्यांच्या साथीदारांना राग आल्याने त्यांनी निष्पाप अश्या पत्रकारांवर यावल पंचायत समिती पासून त्या पत्रकाराला खोट्या गुन्हात अडकूनत्याचा अमानुष पणे छळ केला त्याच प्रमाणे सामाजिक कार्य करणारा सामाजिक कार्यकर्ता यांनी अवैध धंदे बंद करण्यासाठी आवाज उठविला असता त्या सामाजिक कार्यकर्त्यावर देखिल एक नव्हे तर दोन व इतर खोटे गुन्हे दाखल करून त्यांचे जीवन उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला गेला जो सामाजिक कार्यकर्ता सामाजिक कामातून त्यांचे स्वप्न एक चागला अधिकारी होण्याचे पाहत होता असा तो सामाजिक कार्यकर्ता स्पर्धा परीक्षा नेहमी देत आपले उज्वल भविष्य शोधत होता परंतु यावल पोलिस प्रशासनाने त्याचे स्वप्न भंग करून त्या सामाजिक कार्यकर्त्याचा घात या हप्ते खोरानकडून करण्यात आला.आणि तेव्हा पासून खरी यावल तालुक्यात पोलिस प्रशासानाच्या आशीर्वादाने अवैध धंद्यांना सन २०२१ पासून मोठ्या प्रमाणात चालना मिळाली आणि ती आज हि कायम असून मोठ्या प्रमाणात अनेक संसार उध्वस्त होत असल्याने तालुक्यात अवैध रित्या गावठी दारू विक्री करण्यात येत असतांना अवैध गावठी दारू (पोटली) मुळे अनेक संसार उध्वस्त झालेले असून अजून हि मोठ्या प्रमाणात गावठी दारू (पोटली) पिणारे मृत्यू च्या दारात दिसत आहे.२०२१ पासून काही गावात तर घरो-घरी गावठी दारू (पोटली) विकण्यास सुरुवात मोठ्या प्रमाणात झाले ते आज हि कायम असून यावल पोलिस प्रशासनाकडून फक्त नावाला त्यांच्यावर तात्पुरत्या स्वरुपाची कार्यवाही करतात आणि जनतेची नव्हे तर शासनाची मोठी फसवणूक करीत असल्याने चित्र कायम पहावयास मिळते.अश्या यांच्या फसवणुकी मुळे जनतेचा सुरक्षतेबाबत जो विश्वास पोलिस प्रशासनावर होता तो आता पूर्ण पणे नाहीसा झालेला दिसून येत पोलिस प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात हप्त्ते खोरी चालत अवैध धंद्यांना चालना मिळत आहे.त्यामुळे अनेक संसार उघड्यावर येतांना व तरुण युवक मोठ्या प्रमाणात मृत्यू जाळ्यात अडकत असून तरुण वर्ग हा देशाचा एक गाभा आहे पण तोच तरुण वर्ग मात्र अवैध पोटली दारू पिण्याच्या मोहात अडकलेला दिसत आहे.अनेक वेळा महिला वर्गाकडून या अवैध पोटली दारू विकी करण्याऱ्या विरोधात मोर्चे कडून झाले पण अवैध पोटली दारू बंद होईना उलट मोठ्या प्रमाणात हप्ते घेऊन सुरूच ठेवला जात आहे.आणि अनेक संसार उध्वस्त होतांना दिसायला लागले आहे.आता शासनाने याकडे लक्ष केंद्रित करून अवैध धंद्यांना चालना देणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यावर व ज्या जीवित अवैध गावठी दारू मुळे झालेल्या आहेत त्या जीवित हानी ला दोषी धरून अश्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कठोर कार्यवाही करून त्यांना शिक्षेस पात्र ठरवण्यात येऊन तसेच अवैध धंद्या विरोधात आवाज उठवणाऱ्या नागरिकांनावर करण्यात आलेले खोटे गुन्हास जबाबदार असलेल्या पोलिस अधिकारी कर्मचारी यांचावर शासनाने चागल्या प्रकारे चोप देण्याची गरज आहे.त्याचप्रमाणे सुरु असलेले अवैध गावठी दारू व इतर अवैध धंदे बंद करून अनेक संसार उघड्यावर येण्यापासून लगाम बसविण्याची गरज असून यावल तालुक्यात नवीन नियुक्त झालेले पोलिस निरीक्षक धारबडे यांच्या कडे मोठ्या अपेक्षाने यावल तालुक्यातील जनता पाहत आहे कारण जळगाव येथे कार्यरत असतांना पोलिस निरीक्षक धारबडे साहेब यांनी अनेक गोर गरीब जनतेला न्याय मिळून देण्याचे काम केले आहे.त्यामुळे यावल तालुक्यात हि यावल पोलिस स्टेशन पोलिस निरीक्षक व आता नवीन आलेले सर्व पोलिस यंत्रणा यांच्या कडे मोठ्या आपेक्षाने यावल तालुक्यातील जनता पाहत असून यावल तालुक्यात सुरु असलेले अवैध गावठी दारू व इतर धंदे बंद होणार का? व अनेक संसार उघड्यावर येण्यापासून आडा बसेल का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.