पुणे प्रतिनिधी शंकर जोग,
माजी खासदार व महाराष्ट्राचे माजी मंत्री स्वर्गीय वसंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त संकल्प प्रतिष्ठान पुणे यांच्या वतीने पुणे कॅम्प गोळीबार मैदान येथील एस एम जोशी हिंदी माध्यमिक विद्यालय मध्ये वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला होता, यावेळी विविध झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले, यावेळी अखिल भारतीय मजदूर काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष डॉ, अनुपम बेगी, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष सचिन मथुरावाला, संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष समाजभूषण पुरस्कर्ते कविराज संघेलिया, कनव वसंतराव चव्हाण, नरोत्तम चव्हाण, आदि यावेळी उपस्थित होते,