Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

नगरमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराला घरात कोंडले घराबाहेर रिव्हॉल्वर घेऊन पहारा, लोकप्रतिनिधीच्या बॉडीगार्डचे कृत्य

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
January 6, 2026
in क्राईम
0

अहिल्यानगर | प्रशांत बाफना

महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवाराच्या घरासमोर आ. संग्राम जगताप यांच्या बॉडीगार्डच्या हातामध्ये रिव्हॉल्वर असलेला व्हीडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी हा व्हीडीओ पोस्ट करत अहिल्यानगरमधील भयाण परिस्थिती उघडकीस आणल्याने शहरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, उमेदवारांचा जोरात प्रचार सुरू आहे. निवडून येण्यासाठी अनेक फंडे वापरले जात आहे. समोर तुल्यबळ उमेदवार असला तर साम-दाम-दंड-भेद याचा वापर सुरू असतो. प्रशासन निर्भय वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी प्रयत्न करत असले तरी काही ठिकाणी दादागिरी व गुंडगिरीचा वापर केला जात आहे.

मनपाच्या प्रभाग एकमध्ये काँटे की टक्कर होत आहे. याठिकाणी तिरंगी लढती होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर निवडणूक लढत आहे. त्यांच्याविरोधात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार रिंगणात आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार वाणी यांना प्रचार करण्यासाठी घराबाहेर पडू दिले जात नाही. त्यांना घरातच कोंडण्यात आले असून, बाहेर खडा पहारा सुरू आहे. आ. जगताप यांचे स्वीय सहायक व बॉडीगार्ड हे घराबाहेर असून, वाणी यांना बाहेर पडू दिले जात नाही. बॉडीगार्डच्या हातात रिव्हॉल्वर आहे. शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी त्यांच्या अकाउंटवरून हा व्हीडीओ शेअर करत नगरमधील निवडणूक कशा पद्धतीने लढविली जात आहेे, याची पोलखोल केली आहे. तसेच कारवाईची मागणी केेली आहे. त्यांच्या व्हीडीओनंतर नगरमधील शरद पवार गटाच्या पदाधिकार्‍यांनी थेट पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून त्यांना घटनेची वास्तविकता दाखवत कारवाईची मागणी केली.

बंदूक दाखवून धमक्या ः उमेदवार
प्रभाग एक मधून उमेदवारी लढवत आहे. उमेदवारी ड मधून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवारी आहे. प्रचार करतांना अनेक अडथळे येत आहेत. मुले मागे येतात. गन दाखवतात. उमेदवारी मागे घे, प्रचार करु नका असे सांगितले जात आहे. आज माझ्या प्रापर्टीमध्ये दोन पुलीस व दोन अनोळखी माणसे गेट उघडून ओपन रिव्हाल्वर घेऊन आत येत माझ्या येथील माणसांना धमकावले. त्यामुळे माझ्या येथील माणसे मोबाईल बंद करुन पळून गेले आहेत. अशा प्रकारामुळे लोकशाहीचा गळा आवळण्याचा प्रकार सुरु असल्याची प्रतिक्रीया उमेदवार रामदास वाणी यांनी दिली.

प्रभाग तीनमध्ये कोण आहेत उमेदवार
महापालिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज माघारीसाठी काही ठिकाणी वाद विवाद पहावयास मिळाले. शेवटच्या दिवशी भाजपचे तीन उमेदवार बिनविरोध झाले. तर पहिल्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दोन उमेदवार बिनविरोध झाले. प्रभाग एक ड मध्ये शिवसेनेकडून प्रताप सुरेश गडाख, राष्ट्रवादी (अजित पवार) संपत विजय बारस्कर, रामदास विठ्ठल वाणी (शरद पवार) यांच्यात लढत आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार संपत बारस्कर बिनविरोध होतील अशी आशा होती परंतु तसे झाले नाही

Previous Post

यावल येथील शेतकी संघात पत्रकार दिन साजरा, रक्तदान शिबिर संपन्न.

Next Post

तहसिलदारांना निलंबित करा; आंदोलनकर्ते आक्रमक, अन्यथा कायदा हातात घेऊन वाळूचे डंपर पेटवू

Next Post

तहसिलदारांना निलंबित करा; आंदोलनकर्ते आक्रमक, अन्यथा कायदा हातात घेऊन वाळूचे डंपर पेटवू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

साकळी ग्रामपंचायतीच्या खर्चावर संशयाचे सावट!डसबिन वाटपाच्या नावाखाली नेमका कुठून झाला खर्च? माजी सदस्य सैय्यद तैय्यब सैय्यद ताहेर यांचा जाब

January 15, 2026

जळगाव मनपा रणसंग्राम: राजकीय दबावाला न जुमानता ‘स्वराज्य शक्ती सेने’चे १० निष्ठावंत शिलेदार मैदानात

January 14, 2026

ज्योती विद्या मंदिर सांगवी बुद्रुक येथे राष्ट्रीय युवा दिनानिमित्त धावण्याची स्पर्धा

January 14, 2026

साकळीत घाणीचे साम्राज्य!गावातील गटारी तुंबल्या, दुर्गंधीने नागरिक त्रस्तग्रामपंचायत प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष आरोग्य धोक्यात

January 14, 2026

मतदानापूर्वीच अजित पवारांना दणका, राजकीय सल्लगाराच्या कार्यालयावर छापा

January 14, 2026

साकळीतील अंगणवाडीत मुलांच्या पोषण आहारात आळी!प्रशासनाचा ढिसाळ कारभार ठेकेदार, सेविका व मदतनीसांवर कठोर कारवाईची मागणीअन्यथा तीव्र आंदोलन छेडणार

January 14, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..