
मारुळ ता यावल यावल/ रावेर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कार्य तत्पर आमदार श्री अमोल दादा जावळे यांच्या विशेष प्रयत्नातुन व संकल्पनेतुन सर्वसामान्य जनतेच्या शासकीय कामांना गती देण्यासाठी व प्रलंबित तक्रारींचे निवारण एकाच छताखाली व जागेवर होण्यासाठी शासन आपल्या दारी तक्रार निवारण शिबिराचे सरपंच श्री सैय्यद असद अहमद जावेद अहमद ग्रामपंचायत कार्यालय मारुळ यांच्या माध्यमातून व्यवस्था करण्यात आली मारूळ व चारमळी या गावांसाठी शिबीराचे आयोजन करण्यात आले
शासन आपल्या दारी तक्रार निवारण शिबिराच्या अनुषंगाने विविध विभागाच्या प्रशासकीय यंत्रणा थेट आपल्या गावात आल्यामुळे नागरिकांमध्ये उत्साहाचे व चैतन्याचे वातावरण दिसून आले महसूल विभागाचे निवासी नायब तहसीलदार श्री बी एम पवार हे शिबिराचे अध्यक्षस्थानी होते शिबिरास मंडळ अधिकारी फैजपूर श्री जी एन शेलकर ,संजय गांधी निराधार योजनेचे अव्वल कारकुन श्री सकावत तडवी, पुरवठा लिपिक श्री सागर तेली, पुरवठा विभागाचे शेख नासिर शेख हाफिस, तलाठी श्रीमती आर एस जोरवर ,हिंगोणा प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी श्री डॉ साकीब फारुकी, आरोग्य सुपरवायझर किशोर किस्ते ,आरोग्य सेवक दिनेश चौधरी ,आरोग्य सेविका मिना सावले, सौ रेखा तायडे यावल न्यायालयाचे शशिकांत वारुडकर ,कृषी सहाय्यक राजेश कावतखे, ग्रामपंचायत अधिकारी श्री आर टी बाविस्कर या प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपापल्या विभागाच्या विविध योजनांची माहिती देऊन उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले रेशन कार्ड ,घरकुल योजना ,संजय निराधार योजना यासह शासनाच्या कोणत्याही योजनेच्या पात्र व गरजू लाभार्थ्यांनी कोणत्याही दलालास पैसे न देता संबंधित अधिकारी यांच्याशी संपर्क साधून शासकीय योजनांचा लाभ घ्यावा असे आव्हान यावेळी करण्यात आले
चारमळी व मारुळ येथील एन पी सी रेशन कार्डधारकांना धान्य मिळावे या विषयावर नागरिकांचा जास्त जोर दिसून आला तर संजय गांधी निराधार योजना ,वृद्धपाकाळ योजना, श्रावणबाळ योजना, या योजनेच्या लाभार्थ्यांकडे जन्म दाखला उपलब्ध नसल्यास प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी यांचे वयाचे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात यावे तसेच अपंगांना अपंग प्रमाणपत्र हे तालुक्याच्या ठिकाणी जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी तालुकास्तरावर मिळण्या कामी आठवड्यातून एक दिवस ठरविण्यात यावा याकडे आमदार अमोल दादा जावळे व जिल्हाधिकारी जळगाव यांनी विशेष लक्ष द्यावे जेणेकरून अपंगांना होणारा त्रास थांबून त्यांचे आर्थिक नुकसान होणार नाही अशी मागणी करण्यात आली
शिबिरास श्री सैय्यद जावेद अहमद,ग्रामपंचायत सदस्य मुक्तारउद्दीन फारुकी,मूर्तेजाअली सैय्यद ,एकनाथ पाटील, मती उर रहेमान पिरजादे, हिरामण पाटील, रफत अली सैय्यद पत्रकार साहेब सैय्यद ,संजय पाटील ,नरेंद्र तायडे, हिफजुर रहेमान सैय्यद ,यासीन तडवी ,शिकारी पावरा उपस्थित होते
सदरच्या शिबिरास यावल पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी यांनी साफ पाठ फिरवली यावल पंचायत समितीचा एकही अधिकारी किंवा कर्मचारी शिबिरास उपस्थित नसल्यामुळे नागरिकांमध्ये मोठा संताप दिसून आला आमदार अमोल दादा जावळे यांच्या अभिनव व कौतुकास्पद उपक्रमाला पंचायत समिती यावल अधिकारी व कर्मचारी यांनी एक प्रकारे पायमल्ली केल्याची नागरिकांमध्ये चर्चा होती
शासन आपल्या दारी शिबिराचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन ग्रामरोजगार सहाय्यक संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष तथा रोजगार सहाय्यक श्री बाळू तायडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार ग्रामपंचायत अधिकारी श्री आर टी बाविस्कर यांनी मानले यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत लिपिक परवेज सैय्यद ,शिपाई सलीम सैय्यद ,अखलाक फारुकी ऑपरेटर हर्षल कोल्हे जहांगीर तडवी, शफिक उद्दीन फारुकी, इत्यादींनी प्रयत्न केले शिबिरास चारमळी व मारूळ येथील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते







