Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

यावल नगरपरिषद प्रभाग क्र. 8ब मध्ये विक्रमी 77.66% मतदान3434 पैकी 2667 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
December 20, 2025
in जळगाव
0

उपसंपादक:-मिलिंद जंजाळे
यावल नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 8ब मध्ये मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. दि. 20 डिसेंबर रोजी झालेल्या मतदानात एकूण 3434 मतदारांपैकी 2667 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, त्यामुळे या प्रभागात 77.66 टक्के विक्रमी मतदानाची नोंद झाली आहे.
सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांची रांग लागलेली दिसून आली. तरुण, महिला, ज्येष्ठ नागरिकांसह सर्व स्तरातील मतदारांनी लोकशाहीच्या उत्सवात उत्साहाने सहभाग नोंदवला. शांततेत, कोणताही अनुचित प्रकार न घडता मतदान प्रक्रिया यशस्वीपणे पार पडली.
मतदान प्रक्रियेचे यावल तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी मोहनमाला नाझिरकर यांच्या मार्गदर्शनाखाली काटेकोर नियोजन करण्यात आले होते. नेमून दिलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडली.
दरम्यान, यावल पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडे यांच्या नेतृत्वाखाली यावल पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवत कायदा व सुव्यवस्थेची स्थिती अबाधित राखली. त्यामुळे मतदारांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले होते.
प्रभाग क्रमांक 8ब मधील उच्च मतदान टक्केवारीमुळे निकालाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली असून, मतदारांनी दिलेला कौल नेमका कोणाच्या पारड्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी प्रभाग 8ब मधील मतदारांनी दिलेला हा सहभाग नक्कीच प्रेरणादायी ठरत आहे.

Previous Post

यावल–बऱ्हाणपूर रस्त्यावरील वृक्षतोड अभियंत्यांच्या आशीर्वादानेच?परवानगीच्या आदेशावर उडवाउडवी, जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न!

Next Post

फुलगाव येथे आज संत गाडगे बाबा महाराज व माता भिमाई यांना पुण्यतिथी निमित्ताने विनम्र अभिवादन

Next Post

फुलगाव येथे आज संत गाडगे बाबा महाराज व माता भिमाई यांना पुण्यतिथी निमित्ताने विनम्र अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मध्यपूर्वेत तणाव वाढला; भारत सरकारकडून सुरक्षा ॲडव्हायझरीमहाराष्ट्रातील नागरिकांनाही सतर्कतेचे आवाहन

March 1, 2026

धनंजय मुंडेंच्या केसाला धक्का लागला तरी खेळ खल्लास; आमदार सुरेश धससह जरांगेंना मुंडेंच्या समर्थकाची खुलेआम धमकी

March 1, 2026

आश्रम शाळा मगरूळ येथे गंभीर अनियमितता; विद्यार्थी अनुपस्थित, मुख्याध्यापक गैरहजर

March 1, 2026

‘दैनिक हॅलो बातमीदार’च्या दणक्याने कोरपावलीतील बोगस डॉक्टरचे धाबे दणाणले; प्रशासनाकडून अखेर नोटीस!

March 1, 2026

एस.टी.बस इको वाहन अपघात शाळेतील १० लहान मुलं जखमी.शालेय विद्यार्थ्यांची अवैध वाहतूक?

March 1, 2026

दुसखेडा रेल्वे स्टेशनजवळील आंबेडकर नगरकडे दुर्लक्ष? डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुल्या सभागृहाची दुरवस्था; आमदारांनी तात्काळ लक्ष देण्याची मागणी

March 1, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..