
तालुका प्रतिनिधी:- राहुल जयकर
यावल तालुक्यातील नायगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दिनांक 12 डिसेंबर, शुक्रवार रोजी बाल आनंद मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. शिक्षणप्रणित्या सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून मेळाव्याचे औपचारिक उद्घाटन नायगाव ग्रामपंचायत सरपंच सौ. नूरजान तडवी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून व्यवस्थापन समिती सदस्य गोसावी सर (शिक्षक प्रतिनिधी) तसेच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष मा. कल्पेश राजेंद्र पवार, बीसा तडवी, राहुल पाटील, फकरी तडवी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
शाळेचे मुख्याध्यापक भिरूड सर यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे सुव्यवस्थापन व मार्गदर्शन पदवीधर शिक्षक पारधी सर, मगरे सर, तसेच उपशिक्षिका भारती पाटील मॅडम, नजमा तडवी मॅडम, ललिता माळी मॅडम, किशोर पाटील सर आणि भटराज शिरसाठ सर यांनी केले.
बाल आनंद मेळाव्यात विविध खेळ, स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे उपक्रम आयोजित करण्यात आले. लहानग्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवून मेळावा रंगतदार केला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभारप्रदर्शन खुनेपिंप्रे सरांनी उत्कृष्टपणे पार पाडले.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकवर्ग, विद्यार्थ्यांचे पालक व ग्रामस्थांनी सहकार्य केले. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेतून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे सर्वांनी कौतुक केले.







