Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

पाथर्डी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराची अचानक माघार; भाजपच्या खेळीमुळे अजित पवार गटाला धक्का

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
December 11, 2025
in राजकीय
0

अहिल्यानगर/प्रशांत बाफना
पाथर्डी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराची अचानक माघार; भाजपच्या खेळीमुळे अजित पवार गटाला धक्का

पाथर्डी नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी येत्या 20 डिसेंबरला मतदान होणार आहे, या निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि भाजप असा तिरंगी सामना रंगला होता. मात्र आता राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवारानं निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे इथे दुरंगी लढत होणार आहे, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि भाजपमध्ये सामना रंगणार आहे.राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय भागवत यांनी नगरपरिषद निवडणुकीतून माघार घेतली आहे. येत्या वीस डिसेंबरला या नगर परिषदेसाठी मतदान होणार होतं, मात्र त्यापूर्वीच राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवारानं निवडणुकीतून माघार घेतली आहे. या नगर परिषदेसाठी राष्ट्रवादी अजित पवार गट, भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार गट अशी तिरंगी लढत होणार होती. मात्र आता अजित पवार गटाच्या उमेदवारानं माघारी घेतल्यामुळे इथे दुरंगी लढत होणार आहे

पक्षश्रेष्ठी व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेताच भागवत यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याचे सांगितले जाते
भागवत यांना पर्यायी उमेदवार म्हणून अजित पवार गटाने एबी फॉर्मवर नाव टाकलेले राहुल ढाकणे यांचा उमेदवारी अर्ज यापूर्वीच झालेल्या छाननीत‌ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अवैध ठरवला ढाकणे यांच्या उमेदवारी अर्जाला ५ सूचक नसल्याचे कारण देत निवडणूक निर्णय अधिकारी प्रसाद मते व डॉ. उद्धव नाईक यांनी दिले होते. नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक रिंगणात उमेदवारचं नसल्याने अजित पवार गटाची मोठीच गोची झाली आहे. ढाकणे यांचा अर्ज बाद केल्याच्या मुद्यावरून आता अजित पवार गटाने न्यायालयात जाण्याची तयारी केल्याने ही निवडणूक पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे

Previous Post

दिल्ली येथे अनुभव आधारित महिला सरपंचांच्या चार दिवसीय प्रशिक्षण शिबिरासाठी महाराष्ट्रातून मोहरद येथील प्रथम लोकनियुक्त सरपंच अंजुम तडवी यांची निवड

Next Post

जळगाव जिल्हा तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनच्या ७ खेळाडूंची राष्ट्रीय फेडरेशन कपसाठी निवड

Next Post

जळगाव जिल्हा तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनच्या ७ खेळाडूंची राष्ट्रीय फेडरेशन कपसाठी निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ .बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी श्री .विलास नाना साळवे यांची निवड

March 2, 2026

पारंपरिक वाद्य कालबाहय वादकांवर उपासमारीची वेळ…? तुतारी वाद्य नामशेष होण्याच्या मार्गावर..

March 2, 2026

मध्यपूर्वेत तणाव वाढला; भारत सरकारकडून सुरक्षा ॲडव्हायझरीमहाराष्ट्रातील नागरिकांनाही सतर्कतेचे आवाहन

March 1, 2026

धनंजय मुंडेंच्या केसाला धक्का लागला तरी खेळ खल्लास; आमदार सुरेश धससह जरांगेंना मुंडेंच्या समर्थकाची खुलेआम धमकी

March 1, 2026

आश्रम शाळा मगरूळ येथे गंभीर अनियमितता; विद्यार्थी अनुपस्थित, मुख्याध्यापक गैरहजर

March 1, 2026

‘दैनिक हॅलो बातमीदार’च्या दणक्याने कोरपावलीतील बोगस डॉक्टरचे धाबे दणाणले; प्रशासनाकडून अखेर नोटीस!

March 1, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..