
उपसंपादक :-मिलिंद जंजाळे
यावल नगरपरिषद निवडणूक 2025 आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. 2 डिसेंबर रोजी मतदारांचा निर्णायक कौल उमटणार असून नगराध्यक्षा पदापासून ते नगरसेवक पदापर्यंत अनेकांचे राजकीय भविष्य बदलणार आहे.
यावलमध्ये यंदा एक वेगळाच माहोल आहे—मतदार ठाम, आक्रमक आणि परिवर्तनाच्या मूडमध्ये!
‘एका शेर’च्या विरोधात संपूर्ण फौज – पण मतदारांची नजर केवळ कामावर!
यावलमध्ये एका मजबूत गटाच्या विरोधात अनेक नेते, मंत्री, आमदार एकत्र उतरले आहेत.
सभा, मेळावे, प्रचारयात्रा… सर्वकाही दाखवून देण्याची धडपड सुरू आहे.
पण प्रश्न असा यावलचा मतदार इतका भोळा आहे का की बाहेरून आलेल्या मोठ्या नेत्यांच्या चमकदार भाषणांना फसणार?मतदारांचं स्पष्ट म्हणणं “आम्हाला बाहेरचे नेते नको… आमचा विकास, आमचा प्रश्न, आमचा नेता हवा!” यावलचा मतदार ‘घरचा रस्ता’ दाखवायला तयार?
राजकारणाच्या जोरावर, बाहेरील दबावाखाली किंवा सत्ता दाखवून निवडणुकीवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनेक मोठ्या चेहऱ्यांकडे यावलची जनता संशयाने पाहत आहे.
नगरातील चर्चेप्रमाणे मतदारांचा सूर एकच –“यावलच्या घरात यावलचाच नेता हवा. आमच्या गावावर निर्णय घेणारा, आमच्यासोबत जगणारा!”
म्हणूनच मोठा प्रश्न हवाेत तरंगतो आहे
यावलचे मतदार बाहेरून येणाऱ्या मंत्र्यांना व आमदारांना ‘घरचा रस्ता’ दाखवणार का?
की यांचा बाहेरील दबदबा मतदानात प्रभाव टाकणार?
ही लढत केवळ उमेदवारांची नाही…
ही जनतेच्या स्वाभिमानाची निवडणूक बनली आहे!
शांतता नाही, तापलेलं वातावरण — दोन्ही गट आमनेसामने
प्रचारात आरोप–प्रत्यारोपांची मालिका सुरु आहे.
रस्ते, पाणी, स्वच्छता, प्रभागनिहाय विकास… सर्व प्रश्नांवर मतदारांचे धारदार प्रश्न उमेदवारांना छेदत आहेत.
यावलच्या मतदारांनी यंदा आपला मूड स्पष्ट केला आहे—
“जे प्रत्यक्ष काम करेल, त्यालाच मतदान… उरलेले घरी बसू दे!”
2 डिसेंबर – अंतिम निर्णायक दिवस!
यावल नगरपरिषद निवडणूक आता प्रतिष्ठेची राहिली आहे.
उमेदवारांनी जितके दावे केले, त्यापेक्षा जास्त दावे मतदारांनी समोर ठेवले आहेत.
या निवडणुकीत कोण जिंकेल, हे 3 डिसेंबरला कळेल;पण एक गोष्ट ठाम
यावलचा मतदार यावेळी शांत नाही, तर सजग आहे!आणि सजग मतदारापुढे ना मंत्री चालणार,ना आमदारांचा दबाव…
केवळ काम करणारा नेता टिकणार!







