
तालुका प्रतिनिधी: राहुल जयकर
पारोळा, दि. 28 नोव्हेंबर 2025
भीम आर्मी पारोळा चे उपअध्यक्ष राकेश कापडणे यांच्या वाढदिवसानिमित्त पारोळा शहरातील कुटीर रुग्णालय तसेच जवळील आदिवासी वस्तीमध्ये फळवाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला. सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे स्थानिक नागरिकांनी स्वागत केले.
या उपक्रमावेळी डॉ. राजेश वडे, डॉ. जोशी, दीपक सोनार,
एकनाथ पवार (भीम आर्मी तालुका अध्यक्ष),
प्रविण पारधी, रिंकू शेलार, आकाश मोरे, निलेश कापडणे,
अशोक सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी भीम आर्मी पारोळा तालुका टीम तसेच पारोळा तालुक्यातील अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. वाढदिवसाला सामाजिक स्पर्श देत फळवाटप उपक्रमातून वंचित घटकांपर्यंत आनंद पोहोचविण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला.







