Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

हुकूमशाहीच्या इशाऱ्यांना जनता उत्तर देणार मतदानाने आप प्रशांत कांबळे यांची तीव्र प्रतिक्रिया

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
November 25, 2025
in राजकीय
0

नुकत्याच झालेल्या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागरिकांना उद्देशून स्पष्ट इशारा दिला की, “मतदान आमच्या बाजूने नाही केले तर तिजोरीच्या चाव्या आमच्या हातात आहेत”. त्याचबरोबर भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांनीही “तिजोरीचा मालक आम्हीच आहोत आणि चाव्या तुमच्याकडे वॉचमन म्हणून दिल्या आहेत” असे वक्तव्य केले. या दोन्ही विधानांनी लोकशाहीचा आत्मा दुखावला असून, नागरिकांना नोकर समजून सत्ता चालवण्याची मानसिकता स्पष्ट करते.

सत्ताधाऱ्यांचा तिजोरीवर मालकी हक्काचा दावा लोकशाही की लूटशाही?
तिजोरीच्या मालकीचा खरा हक्क हा जनतेचा आहे. जनता ही तिजोरीची मालक असून निवडून आलेले प्रतिनिधी हे फक्त तिचे 5 वर्षा साठी नोकरदार आहेत. परंतु आज हेच नोकर मालक बनण्याचा प्रयत्न करत आहेत. सत्तेच्या अहंकारातून हुकूमशाहीकडे वाटचाल होताना शासनकर्ते सर्वसामान्यांनाच धमकावताना दिसतात.

संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला लोकशाही मूल्यांची पायमल्ली
उद्या संविधान दिन आहे. या संविधानाने प्रत्येक नागरिकास स्वतंत्रपणे मतदानाचा अधिकार दिला आहे, जो कोणत्याही दबाव, धमकी किंवा स्वार्थासाठी वापरला जाऊ नये. पण आज आपण बघतो, की मताच्या जोरावर सत्तेत बसल्यानंतर, हजारो कोटींच्या निधीचा गैरवापर करून, स्वतःची तिजोरी भरण्याचा प्रयत्न हे सत्ताधारी करत आहेत. हा सरळसरळ लोकशाहीवरील प्रहार आहे.

जनतेला नोकर मानण्याची मानसिकता धोकादायक
जनतेकडे चावी देणं म्हणजे सत्ता जनतेची आहे, हे संविधान सांगते. पण चावी देऊनही स्वतःला मालक म्हणणाऱ्या सत्ताधाऱ्यांची ही विचारसरणी ही लोकशाहीच्या विरोधात आणि हुकूमशाहीच्या बाजूने आहे. जनता ही तिजोरीची खरी मालक आहे आणि सत्ताधारी केवळ नोकरदार, हे त्यांना पुन्हा आठवण करून द्यावी लागेल.

आम आदमी पार्टी पुणे शहराध्यक्ष व सामाजिक न्याय विभाग प्रमुख प्रशांत कांबळे यांनी या वक्तव्यांचा तीव्र निषेध केला असून म्हटले आहे.

सत्ताधाऱ्यांनी मतदारांचा अपमान थांबवावा. संविधानाने दिलेला मताधिकार हा कोणत्याही धमकीपेक्षा मोठा आहे. नोकरदार लोकप्रतिनिधी तिजोरी लुटण्याचे संकेत देत आहेत. लोकशाही वाचवायची आहे की तिजोरी
आजचा असली प्रश्न हाच आहे. ही तिजोरी जनतेची ठेवायची की सत्ताधाऱ्याची हे जनतेने आता ठरवलं पाहिजे.

Previous Post

वंचित बहुजन आघाडी जळगांव जिल्हयाचे दोन्ही माजी जिल्हाध्यक्ष यांचा रिपब्लिकन सेना मध्ये जाहीर प्रवेश

Next Post

पिंपळगाव गोलाईत येथे जवळच पीकअप व मोटरसायकलचा भीषण अपघात चार ठार,एक गंभीर जखमी.!

Next Post

पिंपळगाव गोलाईत येथे जवळच पीकअप व मोटरसायकलचा भीषण अपघात चार ठार,एक गंभीर जखमी.!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

साकळी ग्रामपंचायतीच्या खर्चावर संशयाचे सावट!डसबिन वाटपाच्या नावाखाली नेमका कुठून झाला खर्च? माजी सदस्य सैय्यद तैय्यब सैय्यद ताहेर यांचा जाब

January 15, 2026

जळगाव मनपा रणसंग्राम: राजकीय दबावाला न जुमानता ‘स्वराज्य शक्ती सेने’चे १० निष्ठावंत शिलेदार मैदानात

January 14, 2026

ज्योती विद्या मंदिर सांगवी बुद्रुक येथे राष्ट्रीय युवा दिनानिमित्त धावण्याची स्पर्धा

January 14, 2026

साकळीत घाणीचे साम्राज्य!गावातील गटारी तुंबल्या, दुर्गंधीने नागरिक त्रस्तग्रामपंचायत प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष आरोग्य धोक्यात

January 14, 2026

मतदानापूर्वीच अजित पवारांना दणका, राजकीय सल्लगाराच्या कार्यालयावर छापा

January 14, 2026

साकळीतील अंगणवाडीत मुलांच्या पोषण आहारात आळी!प्रशासनाचा ढिसाळ कारभार ठेकेदार, सेविका व मदतनीसांवर कठोर कारवाईची मागणीअन्यथा तीव्र आंदोलन छेडणार

January 14, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..