
पुणे प्रतिनिधी शंकर जोग,
सकल गुलटेकडी पुणे औद्योगिक वसाहत रहिवासी कृती समितीच्या वतीने आयोजित भव्य महाबैठकीत गुलटेकडी परिसरातील सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी एकमुखी ठराव करत स्थानिक कार्यकर्त्यांनाच आगामी महापालिका निवडणुकीत उमेदवारी द्यावी, अशी मागणी जोरदारपणे मांडली.
“माझी वस्ती – माझी जबाबदारी” या घोषणेनं संपूर्ण सभागृह दणाणून गेले.
बैठक अनुसया हॉल, गुलटेकडी पुणे येथे मोठ्या उत्साहात पार पडली.
स्थानिक नेतृत्वाचा ठाम आवाज सर्व वक्त्यांनी असा स्पष्ट संदेश दिला की-
“वस्तीतील प्रश्न, वस्तीतील माणसेच जाणतात. बाहेरून आयात उमेदवार नकोत; आमचे नेतृत्व आमच्याच वस्तीतून हवे.”
बैठकीस उपस्थित प्रमुख
सामाजिक कार्यकर्ते व राजकीय पदाधिकारी महीला मंडळ, मोहल्ला कमिटी, सर्व समाजाचे पदाधिकारी व स्थानिक रहिवासी कार्यकर्ते उपस्थित होते,
सर्वांनी मिळून स्थानिक नेतृत्व, मूलभूत सुविधा, रस्ते, पाणी, स्वच्छता, वाहतूक व विकासकामे तातडीने मार्गी लावण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याचा संकल्प केला.
बैठकीचा मुख्य ठराव
सर्व पक्षांनी स्थानिक कार्यकर्त्यांनाच अधिकृत उमेदवारी द्यावी
वस्तीतील प्रश्नांना प्राधान्य-स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, रस्ते, प्रकाशयोजना
विकासकामांमध्ये नागरिकांचा सहभाग वाढवणे
गुलटेकडी विकास आराखडा बनविण्यासाठी समिती गठीत करण्याची मागणी
नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग गुलटेकडी ऐक्याची नवी ओळख
बैठकीत मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून स्थानिक नेतृत्वाच्या मागणीला पाठिंबा दर्शवला.
गुलटेकडी वस्तीमध्ये ही महाबैठक “नव्या परिवर्तनाची सुरुवात” म्हणून पाहिली जात आहे.







