
भडगांव प्रतिनिधी शेख जावीद मौजे पिंपरखेड ता.भडगांव येथील वाल्मिक हेडंगे व नारायण हेडंगे यांच्या संशयास्पद/घातपाती मृत्यु प्रकरणी समाजामध्ये व परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले असुन गावात व परीसरात सर्वत्र या घटनेचा निषेध नोंदविण्यात येत आहे. भविष्यात सामाजिक तेढ व कायदा व सुव्यवस्था धोक्यात येऊ नये म्हणून सदर प्रकरणाची सी.आय.डी. (Central Bureau of Investigation C.I.D.) यांच्या पथकाकडून सखोल चौकशी होऊन पिडीत कुटूंबाला न्याय देणे गरजेचे आहे.असे आशेचे निवेदन मा.तहसिलदार,डि.वाय.
एस.पी.व पोलिस निरीक्षक भडगांव यांना समता सैनिक दलातर्फे आशेवर निवेदन देण्यात आले तसेच दोन्ही घटनेतील कुटुंबातील कर्त्या पुरूषांचा घातपात करून त्यांचा संशयास्पद खुन झाल्यामुळे सदरचे कुटुंब हे मागासवर्गीय सामाजाचे असल्यामुळे त्या कुटुंबामध्ये भितीचे व उपासमारीची वेळ आली तसेच जो पर्यत या घटनेचे मुळ कारण व दोषींना शिक्षा व मुख्य सुत्रधार याला अटक होऊन कठोर शिक्षा होत नाही तो पर्यंत सदर पिडित कुटुंबांस शासनाकडून संरक्षण व आर्थिक मदत मिळावी असे जिल्हाध्यक्ष किशोर डोंगरे यांनी सांगितले व भविष्यात अशा घटना होऊ नये यासाठी समता सैनिक दलामार्फत लोकशाही मार्गाने निषेध व आक्रोश मोर्चा काढण्यात येईल.महोदय, व सदर प्रकरणांची गार्भियांने दखल घेत तत्काळ (C.I.D.) अज्ञाताकडून झालेल्या खुनाची चौकशी करणे गरजेचे आहे.असे न झाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा मान राखत निषेध व आक्रोश मोर्चा जन आंदोलन करून काढण्यात येईल, निर्माण होणा-या परिस्थितीस संबंधीत प्रशासन व अधिकारी हे जबाबदार राहतील.
असे सदर निवेदनात नमूद केले आहे. यावेळी समता सैनिक दलाचे तालुका व जिल्हा कार्यकारणीचे पदाधिकारी व सैनिक उपस्थित होत.







