
जळगाव : दैनिक हॅलो बातमीदारच्या दिवाळी अंक प्रकाशनाचा भव्य आणि उत्साहवर्धक सोहळा दिनांक १३ नोव्हेंबर २०२५ रोजी शिक्षण शास्त्र विद्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला. प्रसिध्द विधीतज्ञ ॲड. राजेशजी झाल्टे यांच्या हस्ते दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अचूक आणि आकर्षक सूत्रसंचालन ज्योती राणे यांनी केले. कार्यक्रमाची आखणी भव्य आणि सुरळीतपणे पार पाडण्यासाठी मुख्य संपादक सुमित सोनवणे व कार्यकारी संपादक प्राजक्ता तायडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती लाभली. विशेष अतिथी म्हणून वन अधिकारी बी. के. थोरात, नॅशनल व्हॉइस मीडिया फोरम पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय सचिव प्रकाशजी सरदार, जिल्हाध्यक्ष दिनेशजी इखारे, साकडीचे लोकनियुक्त सरपंच दीपकजी पाटील, अमोलजी कोल्हे,तसेच कामगार नेते असद शेख यांनी आपली उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाला विशेष उठाव दिला.
दिवाळी अंक प्रकाशन सोहळा यशस्वी करण्यासाठी उपसंपादक मन्सूर तडवी, उपसंपादक मिलिंद जंजाळे, जाविद शेख, अमोल खरात, राहुल जयकर व उमेश तायडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
एकूणच, हॅलो बातमीदारच्या दिवाळी अंक प्रकाशन सोहळ्याने उपस्थित मान्यवर व पत्रकार बांधवांच्या सान्निध्यात एक संस्मरणीय क्षण अनुभवायला मिळाला.







