
प्रशांत बाफना/ : अहिल्यानगर
तालुक्यातील श्रद्धा सार्वजनिक वाचनालयाला नुकतीच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य व रोगप्रतिबंधक शास्त्राचे गाढे अभ्यासक डॉ. राजेश गायकवाड यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली. भेटीदरम्यान त्यांनी वाचनालयाचे उपक्रम याबद्दल अधिक माहिती जाणून घेतली. श्रद्धा सार्वजनिक वाचनालयाचे सचिव वसंत कर्डिले यांनी त्यांचे स्वागत केले.
यावेळी डॉ. राजेश गायकवाड यांनी ‘ग्रामीण भागातील अत्यंत लहान गावात छोट्याशा इमारतीमध्ये थाटलेल्या श्रध्दा सार्वजनिक वाचनालयाचे काम अत्यंत कौतुकास्पद आहे. सुमारे ४७०० ग्रंथ वाचनालयात उपलब्ध आहेत. वाचकांना ते नियमित वृत्तपत्रे व ग्रंथ वाचनासाठी उपलब्ध करून देत आहेत. अन्न हे माणसाला जगायला आवश्यक आहे. तर पुस्तकं, ज्ञान व साहित्य हे मानवी जीवनाला समृद्ध करते. ग्रामीण भागातील ही चळवळ आणखी समृद्ध होणे आवश्यक असल्याचे’ मत व्यक्त केले.
यावेळी प्रविण शेळके, तेजस कडिॅले ,गणेश वाबळे.आदी उपस्थित होते. वाचनालयाच्या ग्रंथपाल यमुना कांडेकर यांनी आभार मानले







