
उपसंपादक:-मिलिंद जंजाळे
साकळी (ता. यावल) येथे राहणारी १२ वर्षीय नंदिनी लखीचंद निळे हिचे दिनांक ८ नोव्हेंबर रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. नंदिनी इयत्ता ६ वीमध्ये शिक्षण घेत होती. चिमुरड्या वयातच तिच्या जाण्याने साकळी गाव शोकसागरात बुडाले आहे.
नंदिनीच्या पश्चात आई-वडील, भाऊ, बहीण तसेच काका-काकू असा प्रियजणांचा परिवार आहे. अभ्यासू, हसतमुख आणि शांत स्वभावामुळे शाळेत, मैत्रिणींमध्ये व शेजारपाजारात ती विशेष आवडती होती. अचानक प्रकृती खालावल्यानंतर उपचार सुरू असतानाच तिची प्राणज्योत मालवली.
नंदिनीच्या निधनाची बातमी समजताच साकळी गावातील वातावरण हळहळून गेले. तिच्या घराबाहेर आज शोकाकुल वातावरण पाहायला मिळाले. नंदिनीच्या सहाध्यायी व शिक्षकांनीदेखील अश्रू ढाळत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
स्थानिक ग्रामस्थ व नातेवाईकांनी सांगितले की, “घरातील हसूच जणू थांबून गेले. एवढ्या लहान वयात देवाने तिची बोलावणी करू नये होती.”
चिमुकली देवदूत नंदिनीला साकळी येथील स्मशानभूमीत गावकऱ्यांच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
या दुःखद प्रसंगात दैवदुर्विलासापुढे मानवी हात लहान पडतात, तरी ईश्वर परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो, ही प्रार्थना.







