
(प्रतिनिधी:अमोल खरात)
जामनेर: तालुक्यातील हिवरखेडा येथे २/१०/२०२५ रोजी झालेल्या दुर्दैवी घटनेमुळे खळबळ उडाली होती.यात प्रदीप चांदणे यांचा मृत्यू झाला होता तरी, प्रदीप चांदणे यांचा मृत्यू नसुन हा घातपात झाला असल्याच्या कारणावरून एकच खळबळ उडाली होती.
सदर घटनेची चौकशी करून संशयित आरोपींवर कार्यवाही करुन त्यांना लगेचच सोडल्या गेले असल्यामुळे चांदणे परिवार व समाज बांधवांमध्ये संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत.
योग्य तो न्याय मिळावा म्हणून त्यांच्या पत्नी मंगलाबाई प्रदीप चांदणे यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी जामनेर तहसील कार्यालया समोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.
पोलीस प्रशासनाने आश्वासन देऊन देखील पोलीस विभागाकडून प्रदीप चांदणे यांच्या मृत्यूनंतर ची चौकशी केली नाही.
मृत्यूची CBI चौकशी करून प्रदीप चांदणे यांच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक व्हावी म्हणून संबंधित शासन प्रशासनाला पिडीत कुटुंबीयांच्या वतिने निवेदन देण्यात आले होते तरी पाहिजे ती दखल घेतल्या गेली नाही.
प्रदिप चांदणे च्या मृत्यूचा काळ हा महिन्यावर लोटल्यानंतरही योग्य प्रकारे तपास झाला नसल्याने गुण्हेगारांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.त्यामुळे न्याय मागणीकरीता दि.०७/११/२०२५ पासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु करण्यात आले असता जिल्हा पोलीस प्रशासनाने उच्च स्तरीय चौकशी करावी, पोस्ट मार्डम रिपोर्ट ची सखोल चौकशी करून योग्य तो रिपोर्ट द्यावा, पिडीत कुटुंबीयांच्या लहान मुलांनीचा व पत्निचा विचार करता काही आर्थिक मदत देण्यात यावी,सदर घटनेची सिबिआय चौकशी करण्यात यावी व गुण्हेगारांना अटक करुन मनुष्यवधाचा गुण्हा दाखल करण्यात यावा.
प्रदीप कडू चांदणे यांच्या मृत्यूचे सदर घटनेचे पुरावे नष्ट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर व आरोपींनवर कठोर कारवाई करण्यात यावी.
पीडित कुटुंबास ₹ १० लाख (दहा लाख )रुपयांची आर्थिक मदत करण्यात यावी.
पीडित कुटुंबास न्याय मिळावा म्हणून उपोषणास बसलेल्या कार्यकर्त्यास व मृतक प्रदीप चांदणे च्या पालकास काही नुकसान व तब्बेतीची काही कमी जास्त झाल्यास त्याची सर्वस्वी जिम्मेदारी प्रशासनाची असेल.
शासन प्रशासनाने गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन उच्चस्तरीय सीबीआय चौकशी करुन प्रदीप चांदणे च्या मृत्यूस जबाबदार कर्मचारी व अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करण्यात यावी योग्य मार्गाने न्याय मिळेपर्यंत उपोषण सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.







