
उपसंपादक मन्सूर तडवी
रावेर 06 नोव्हेंबर 2025 रोजी सहस्रलिंग तालुका रावेर येथे जिल्हा परिषद शाळेत एक आगळा वेगळा आणि अविस्मरणीय असा वाढदिवस साजरा करण्यात आला.
भुसावळ येथील रहिवासी असलेले तडवी द गाईड संघटनेचे संस्थापक श्री अशफाक जरदार तडवी सर व त्यांचे कुटुंब यांनी आपल्या लहान बाळाचा, चिरंजीव अरहान याचा वाढदिवस सामाजिक जाणीव जोपासत आमच्या जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांसोबत एका अनोख्या पद्धतीने साजरा केला.
आज दुपारी चार वाजेच्या सुमारास अशफाक तडवी सर आणि त्यांचे कुटुंब यांनी जिल्हा परिषद शाळा सहस्त्रलिंग येथे अचानक भेट दिली आणि आपल्या बाळाचा वाढदिवस आमच्या विद्यार्थ्यांसोबत साजरा करण्याची इच्छा व्यक्त केली ..
सर्वप्रथम जिल्हा परिषद शाळा सहस्रलिंगचे मुख्याध्यापक श्री विकास सुरवाडे सर यांनी श्री अशफाक तडवी सर आणि त्यांच्या कुटुंबाचे स्वागत केले त्यानंतर चि. अरहान तडवी याच्या वाढदिवसानिमित्त केक कापून सर्वांनी त्यास दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या.. तद्नंतर अशफाक तडवी सर यांनी त्यांच्या कुटुंबाने सर्व विद्यार्थ्यांना केक आणि इतर मिठाई यांचे वाटप केले त्याचबरोबर सुयोग्य आणि सुंदर असे लेखन साहित्य पॅड आणि पाणी बॉटल (तडवी द गाईड गृप तर्फे) यांचे देखील वाटप करून विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याची प्रेरणा दिली.
आदरणीय अशफाक तडवी सर यांचा दातृत्वाचा हा तिसरा अनुभव जिल्हा परिषद शाळेने आज अनुभवला. यापूर्वीही सरांच्या माध्यमातून गावातील पोलिस भरती तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्यक पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली होती.
दुसऱ्या वेळेला आमच्या जिल्हा परिषद शाळा सहस्रलिंग येथे आमच्या विद्यार्थ्यांना दिवाळी फराळाचं वाटप अशफाक तडवी सर आणि पोदार इंटरनॅशनल स्कूल भुसावळ यांच्या वतीने करण्यात आलेलं होतं त्याही वेळेला सरांच्या माध्यमातून आमच्या विद्यार्थ्यांसोबत आनंदाची दिवाळी साजरी करण्यात आली आणि आजही त्यांनी आपला कौटुंबिक आनंद आमच्या विद्यार्थ्यांसोबत साजरा केला त्याबद्दल अशपाक तडवी सर यांचे जिल्हा परिषद शाळा सहस्रलिंग यांच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करण्यात येत आहे.सदरील कार्यक्रम हा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री युनूस तडवी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक श्री साईनाथ चन्ने सर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मुख्याध्यापक श्री विकास सुरवाडे सर यांनी केले.या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य श्री आसिफ मुस्तफा तडवी यांनी देखील मोलाचे सहकार्य केले. सर्वांच्या उपस्थितीत हा आनंददायी सोहळा खूप आनंदाने पार पडला.. आपल्या मार्गदर्शन पर भाषणामध्ये अशफाक तडवी सर यांनी अशी इच्छा व्यक्त केली की गावातील आणि शाळेतील विद्यार्थ्यांमधून एक उत्कृष्ट असे नागरिक , उत्कृष्ट असे अधिकारी घडावेत हीच त्यांची अपेक्षा आहेत आणि त्यासाठीच ते असे विविध उपक्रम जिल्हा परिषद शाळांमध्ये राबवत आहेत,त्यांची ही इच्छा जरूर पूर्ण होवोत अशीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि त्यांच्या दोन्ही बाळांना दीर्घायुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देऊन या कार्यक्रमाची सांगता झाली…







