Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

अवकाळी पावसाने शेतीचे मोठे नुकसान; आमदार अनिल पाटील यांनी तात्काळ पंचनाम्याची मागणी केली

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
October 28, 2025
in राजकीय
0

पाचोरा प्रतिनिधी शेख जावीद
अमळनेर गेल्या काही दिवसांपासून अमळनेरसह उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसाने थैमान घातले असून शेतकऱ्यांच्या खरीप हंगामावर पाण्याचे संकट कोसळले आहे. खरीपाच्या सुरुवातीला पावसाने मारलेली दडी आणि नंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे बळीराजाचे नुकसान झालेच; पण आता सततच्या अवकाळी पावसामुळे उभ्या आणि कापणीस तयार झालेल्या पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे.या पार्श्वभूमीवर अमळनेरचे आमदार आणि राज्याचे माजी आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी राज्याचे सध्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांना पत्र लिहून तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी केली आहे.आमदार पाटील यांनी त्यांच्या पत्रात नमूद केले आहे की, अमळनेरविधानसभामतदारसंघातील ८१,२१२ हेक्टर लागवडीखालील क्षेत्रापैकी ४६,९४८ हेक्टरवरील कपाशी, २९,४१२ हेक्टरवरील मका, ३,५४४ हेक्टरवरील ज्वारी, ७४७ हेक्टरवरील बाजरी आणि २०० हेक्टरवरील सोयाबीन पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
शासनाच्या विद्यमान नियमांनुसार केवळ उभ्या पिकांचाच पंचनामा केला जातो; मात्र या वेळी शेतकऱ्यांच्या शेतात कापणी झालेली, परंतु शेतात पडून खराब झालेली पिकेही अवकाळी पावसामुळे नष्ट झाली आहेत. त्यामुळे अशा प्रकरणांनाही ‘विशेष बाब’ म्हणून पंचनाम्यात समाविष्ट करून सरसकट आर्थिक मदत देण्याची मागणी आमदार पाटील यांनी केली आहे.बळीराजाच्या हाता-तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून घेतला आहे. शासनाने तत्काळ पावले उचलून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा,” असे आमदार पाटील यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.दरम्यान, अमळनेर तालुक्यातील विविध गावांतील शेतकऱ्यांनीही प्रशासनाकडे नुकसानभरपाईसाठी मागणी केली असून जिल्हा प्रशासनाने यावर तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Previous Post

जळगाव पाचोरा रस्त्यावर लक्झरी बस व कारची समोरासमोर धडक.गोराडखेडा गावानजीक अपघात.सुदैवाने जिवितहानी टळली.

Next Post

स्मार्ट मीटर विरोधात भीम आर्मी ने दिले निवेदन

Next Post

स्मार्ट मीटर विरोधात भीम आर्मी ने दिले निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

साकळी ग्रामपंचायतीच्या खर्चावर संशयाचे सावट!डसबिन वाटपाच्या नावाखाली नेमका कुठून झाला खर्च? माजी सदस्य सैय्यद तैय्यब सैय्यद ताहेर यांचा जाब

January 15, 2026

जळगाव मनपा रणसंग्राम: राजकीय दबावाला न जुमानता ‘स्वराज्य शक्ती सेने’चे १० निष्ठावंत शिलेदार मैदानात

January 14, 2026

ज्योती विद्या मंदिर सांगवी बुद्रुक येथे राष्ट्रीय युवा दिनानिमित्त धावण्याची स्पर्धा

January 14, 2026

साकळीत घाणीचे साम्राज्य!गावातील गटारी तुंबल्या, दुर्गंधीने नागरिक त्रस्तग्रामपंचायत प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष आरोग्य धोक्यात

January 14, 2026

मतदानापूर्वीच अजित पवारांना दणका, राजकीय सल्लगाराच्या कार्यालयावर छापा

January 14, 2026

साकळीतील अंगणवाडीत मुलांच्या पोषण आहारात आळी!प्रशासनाचा ढिसाळ कारभार ठेकेदार, सेविका व मदतनीसांवर कठोर कारवाईची मागणीअन्यथा तीव्र आंदोलन छेडणार

January 14, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..