
पाचोरा प्रतिनिधी शेख जावीद
फलटण येथील उपजिल्हा रुग्णाल यातील महिला वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सहभाग व दरम्यान झालेल्या गंभीर प्रशासकीय त्रुटींच्या पार्श्वभूमीवर तातडीने उच्चस्तरीय चौकशी करण्याबाबत धुळ्यात शिवसेना उ बा ठा पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी विसपुते मॅडम यांना निवेदन देण्यात आले निवेदनामध्ये आत्महत्याग्रस्त महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. संपदा मुंडे यांनी मृत्यूपूर्वी स्वतःच्या तळहातावर लिहिलेल्या मजकुरा नुसार, पोलीस निरीक्षक गोपाल बदने यांनी तिच्यावर बलात्कार केला तसेच प्रशांत बनकर व इतरांकडून मानसिक व शारीरिक छळ सहन करावा लागत असल्याची सुसाईड नोट लिहिलेली आढळून आली असून ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे नमूद केले असून जर रक्षकच भक्षक झाल्याने न्याय मागायचा कुणाकडे? अशी परिस्थिती या राज्यात निर्माण झालेली असून संबंधित महिला डॉक्टरने यापूर्वी वेळोवेळी तक्रारी करून देखील त्यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेल्याने सदरची घटना घडली असून राज्यातील महिला सुरक्षिततेबाबत विद्यमान सरकार किती निष्काळजी असल्याचे यावरून दिसते.
तसेच सदर प्रकरणात आरोपींना संरक्षण देण्यासाठी सत्ताधारी पक्षाशी संबंधित माजी खासदार रणजीत नाईक निंबाळकर व त्यांचे दोन स्वीय सहाय्यक राजेंद्र शिंदे व रोहित नागतळे हे स्थानिक प्रशासनावर अनुचित प्रभाव टाकत असल्याचे गंभीर बाब निदर्शनास आली आहे. राज्याची सत्ता व अधिकाऱ्यांचा अशा प्रकारे गैरवापर होणे हे संविधान व कायद्याच्या शासनाच्या संकल्पनेची विसंगत असल्याचे निवेदनात नमूद केलेले आहे. डॉक्टर संपदा मुंडे या त्यांच्या सेवाकालात शविच्छेदन व वैद्यकीय तपासणीचे कार्य पार पाडत असताना पोलिसांकडून काही आरोपींबाबत पक्षपाती प्रमाणपत्र देण्याबाबत दबाव आणला जात होता. वैद्यकीय नैतिकता आणि शासकीय नियमांचे पालन करत हा दबाव नाकारल्यामुळे महिला डॉक्टरांचा छळ करण्यात आला व या संबंधि दोन-तीन महिन्यांपूर्वी त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केल्याचे व त्या संदर्भात माहिती अधिकाराखाली अर्ज केला असल्याची उपलब्ध नोंदी दर्शवत असताना देखील त्यांच्यावर योग्य ती कारवाई न झाल्याने त्यांचा छळ वाढून अखेरीस त्यांनी आत्महत्या करून जीवन संपवण्याचा अत्यंत टोकाचा निर्णय घेतला हा राज्यव्यवस्थे साठी मोठा धोक्याचा इशारा आहे तसेच पिडीतेच्या कुटुंबीयांनी राजकीय हस्तक्षेप व दडपशाही बाबत देखील गंभीर आरोप करत त्वरित न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. तथापि पोलिसांकडून तक्रारीचे दुर्लक्ष होणे मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यास विलंब होणे आणि प्राथमिक पातळीवर वस्तुनिष्ठ दृष्टिकोन न दिसणे या बाबी चौकशीच्या विश्वसनीयतेवर प्रश्न उपस्थित करतात. त्याचप्रमाणे पीडित वैद्यकीय महिला अधिकारी यांचे चरित्र हनन करण्याचा देखील प्रयत्न काही समाज माध्यमातून सुरू असल्याची बाब गंभीर स्वरूपाची आहे.अशा परिस्थितीत प्रकरणात केवळ प्रथागत चौकशी न होता स्वतंत्र उच्चस्तरीय तपास यंत्रणांकडून निष्पक्ष सखोल व वेळेत तपास होण्याची व संबंधित आरोपींना गंभीरात गंभीर म्हणजे फाशीची शिक्षा देण्यात यावी असे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या राज्य उपनेते शुभांगी ताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली महिला आघाडीच्या वतीने देण्यात आले. या वेळी शिवसेनेच्या महिला पदाधिकारी अरुणा मोरे ,सुनीता वाघ , संगीता जोशी, जयश्री वानखेडे, ज्योती चौधरी, मीनाक्षीताई पाटील, तारा ताई विवरेकर, पुष्पाताई बडगुजर, मुक्ता सोनवणे, मीनाक्षी देवरे आदी पदाधिकारी उपस्थित होत्या.







