Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

चोपडा शहर पोलिसांच्या कारवाईत सात सराईत गुन्हेगार जेरबंद १३ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
October 27, 2025
in क्राईम
0

उपसंपादकमन्सूर तडवी

चोपडा शिरपूर बायपास रोडवर मध्यरात्री प्राणघातक हत्यारांसह रस्तालुटीच्या तयारीत असलेल्या सात सराईत गुन्हेगारांच्या टोळीला जेरबंद केले आहे.
दिनांक २७ ऑक्टोबर रोजी रात्री २:३० वाजण्याच्या सुमारास ही धडक कारवाई करण्यात आली. आरोपींकडून दोन लोड केलेले गावठी कट्टे, दोन तलवारी, एक रिकामे मॅगझीन, रोख रक्कम, मोबाईल फोन आणि गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट डिझायर कार असा एकूण १३ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये नांदेड, वैजापूर (संभाजीनगर) आणि चोपडा येथील सराईत गुन्हेगारांचा समावेश आहे.
चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना २७ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास शिरपूर बायपास रोडवर एका पांढऱ्या रंगाच्या संशयास्पद गाडी (स्विप्ट डिझायर क्र. MH २६ CH १७३३) बद्दल गोपनीय माहिती मिळाली. या गाडीत काही इसम बराच वेळ थांबलेले होते. माहितीची खात्री करताच,  साळवे यांनी तात्काळ एक पोलीस पथक तयार करून संशयित गाडीचा शोध सुरू केला.रणगाडा चौकाच्या थोडे पुढे, बायपास रोडच्या बाजूला ही कार थांबलेली दिसली. गाडीच्या बाहेर दोघेजण परिसरावर पाळत ठेवत उभे होते, तर पाच जण आत बसले होते. पोलिसांची चाहूल लागताच त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र आधीच सावध असलेल्या पोलीस पथकाने घेराव घालून सातही जणांच्या मुसक्या आवळल्या.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत

१. दिलीपसिंघ हरीसिंघ पवार (वय ३२, रा. नांदेड)
२. विक्रम बाळासाहेब बोरगे (वय २४, रा. वैजापूर, जि. संभाजीनगर)
३. अनिकेत बालाजी सुर्यवंशी (वय २५, रा. नांदेड)
४. अमनदिपसिंघ अवतारसिंग राठोड (वय २५, रा. नांदेड)
५. सद्दामहुसेन मोहंम्मद अमीन (वय ३३, रा. नांदेड)
६. अक्षय रविंद्र महाले (वय ३०, रा. चोपडा)
७. जयेश राजेंद्र महाजन (वय ३०, रा. चोपडा)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेले सर्व आरोपी नामचीन आणि धोकादायक गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर यापूर्वी नांदेड, वैजापूर (जि. संभाजीनगर) आणि चोपडा येथे खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, दंगल, दहशत माजवणे, तसेच अग्निशस्त्रे (गावठी कट्टे) व तलवारी बाळगणे यासारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.आरोपी दिलीपसिंघ पवार याच्यावर खुनासह ७ गंभीर गुन्हे, तर अनिकेत सुर्यवंशी याच्यावर खुनाचा प्रयत्न, दरोडा, खंडणी अशा तब्बल १४ गुन्ह्यांची नोंद आहे. धक्कादायक म्हणजे, आरोपी विक्रम बोरगे हा वैजापूर येथील दरोडा व आर्म्स अॅक्टच्या गुन्ह्यात फरार होता. यातील दोन आरोपी नुकतेच एमपीडीए (MPDA) कायद्यान्वयेच्या स्थानबद्धतेतून बाहेर आले होते. चोपडा येथील आरोपी अक्षय महाले याच्यावरही पूर्वी अग्निशस्त्र बाळगल्याप्रकरणी व दंगलीचा गुन्हा दाखल आहे.
प्राथमिक तपासात या आरोपींची एक विशिष्ट गुन्हेगारी पद्धत समोर आली आहे. हे आरोपी नांदेड परिसरात लोकांमध्ये शस्त्रांचा धाक दाखवून दहशत माजवत असत. खंडणी वसुल करणे, खंडणीसाठी अपहरण करणे, इतकेच नव्हे तर लोकांना विवस्त्र करून त्यांचा छळ करणे व त्याचे व्हिडीओ बनवून इतरांना घाबरवण्यासाठी वापरणे, असे धक्कादायक प्रकार हे आरोपी करत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
याप्रकरणी, सातही आरोपींविरुद्ध संगनमताने दरोड्याची तयारी करून सशस्त्र स्थितीत जमल्याबद्दल चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजि. नं. ५८१/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३१०(४) (दरोड्याची तयारी), ३१०(५), शस्त्र अधिनियम कलम ३/२५, ४/२५ आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) चे उल्लंघन केल्याप्रकरणी कलम १३५ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सर्व आरोपींना अटक करण्यात आले असून, त्यांना रिमांडसाठी न्यायालयात हजर करण्यात येत आहे.
सदरची कौतुकास्पद कारवाई पोलीस अधीक्षक  महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर (चाळीसगाव), आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे, पोहेकों हर्षल पाटील, संतोष पारधी, ज्ञानेश्वर जवागे, पोकों अजिंक्य माळी, अमोल पवार, मदन पावरा, रविंद्र मेढे, विनोद पाटील, चालक पोहेको किरण धनगर, योगेश पाटील, आणि प्रकाश ठाकरे यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चेतन परदेशी हे करत

Previous Post

पुणे कॅम्प मर्चंट असोसिएशन व कॅम्प ज्वेलर्स ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने व्यापारी मेळावा व दिवाळी फराळ कार्यक्रम संपन्न,,

Next Post

फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी निष्पक्ष एस आय टी चौकशी ची शिवसेना ऊ. बा. ठा. महिला आघाडीची निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Next Post

फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी निष्पक्ष एस आय टी चौकशी ची शिवसेना ऊ. बा. ठा. महिला आघाडीची निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

साकळी ग्रामपंचायतीच्या खर्चावर संशयाचे सावट!डसबिन वाटपाच्या नावाखाली नेमका कुठून झाला खर्च? माजी सदस्य सैय्यद तैय्यब सैय्यद ताहेर यांचा जाब

January 15, 2026

जळगाव मनपा रणसंग्राम: राजकीय दबावाला न जुमानता ‘स्वराज्य शक्ती सेने’चे १० निष्ठावंत शिलेदार मैदानात

January 14, 2026

ज्योती विद्या मंदिर सांगवी बुद्रुक येथे राष्ट्रीय युवा दिनानिमित्त धावण्याची स्पर्धा

January 14, 2026

साकळीत घाणीचे साम्राज्य!गावातील गटारी तुंबल्या, दुर्गंधीने नागरिक त्रस्तग्रामपंचायत प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष आरोग्य धोक्यात

January 14, 2026

मतदानापूर्वीच अजित पवारांना दणका, राजकीय सल्लगाराच्या कार्यालयावर छापा

January 14, 2026

साकळीतील अंगणवाडीत मुलांच्या पोषण आहारात आळी!प्रशासनाचा ढिसाळ कारभार ठेकेदार, सेविका व मदतनीसांवर कठोर कारवाईची मागणीअन्यथा तीव्र आंदोलन छेडणार

January 14, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..