
पुणे येथील नामांकित शिक्षण संस्था नौरोसजी वाडिया महाविद्यालयातील कार्यरत कर्मचारी, साहित्यिक, कवी श्री दिनेश ताराचंद खैरे यांना सामाजिक आणि साहित्यिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीची घोषणा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. डॉक्टर शरद गोरे (सर )आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष शुभांगीताई काळभोर यांच्या स्वाक्षरीने दिनांक 25 सप्टेंबर 2025 रोजी करण्यात आली. श्री दिनेश खैरे यांच्या नियुक्तीचा काळ 31 डिसेंबर 2028 पर्यंत असणार आहे. साहित्यिक,कवी श्री दिनेश तारचंद खैरे यांनी ग्रामीण भागातील साहित्यिक चळवळीला चालना देत अनेक नवीन कवी ,लेखक आणि वाचक तयार केले आहेत. त्यांची दोन पुस्तके सुद्धा प्रकाशित झाली आहेत. मितभाषी, मृदू स्वभावाचे, सेवा कार्यतत्पर कवी लोकसाहित्यिक म्हणून सुपरिचित आहेत. सामाजिक सांस्कृतिक ,शैक्षणिक, अध्यात्मिक अशा सर्व क्षेत्रात त्यांचा वावर आहे. यापूर्वी त्यांना अनेक राज्यस्तरीय , राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. तसेच तसेच मराठी साहित्याचा प्रसार आणि नव्या पिढीत साहित्य प्रेम, वाचनाची आवड, नैतिक मूल्य जागवण्यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून अधिक सक्रिय कार्य करणारा असल्याचे श्री दिनेश ताराचंद खैरे यांनी असे आपले मनोगत व्यक्त केले. त्यांच्या या नियुक्तीबद्दल कवी, साहित्यिक,सामाजिक कार्यकर्ते मित्रपरिवार आणि चाहत्यांकडून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.







