
उपसंपादक :- मिलिंद जंजाळे
साकळी येथील नूतन साकळी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि.या संस्थेची दि.१८ रोजी संस्थेचे चेअरमन सौ. मराबाई तडवी तसेच व्हाईस चेअरमन ईश्वर कोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत संचालक मंडळाची सभा आयोजित करण्यात आलेली होती.याप्रसंगी संस्थेच्या सभासदांमधून विलास लक्ष्मण पवार तसेच शे. सलिम शे.अब्दुल हक या दोघांची तज्ञ संचालकपदी निवड करण्यात आली आहे.पॅनल प्रमुख तथा जि.प.माजी शिक्षण व आरोग्य सभापती रविंद्र सूर्यभान पाटील तसेच माजी उपसरपंच वसीमखान हाजी आसिफखान यांच्या सूचनेवरून सदर दोघं पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आलेली आहे.सदर निवड प्रक्रियेदरम्यान संस्थेचे सचिव प्रमोद लोधी तसेच लिपिक अशोक मराठे यांनी कामकाज पाहिले.यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य सर्फराज रुबाब तडवी तसेच नितीन फन्नाटे उपस्थित होते.नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे रविंद्र पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.निवड झालेल्या दोघं पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.







