
जळगाव (प्रतिनिधी) :
नेरी नाक्याजवळील श्री. वानखेडे गुरुजी हाऊसिंग सोसायटीतर्फे रविवार, दिनांक 19 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता घंटागाडी सेवक श्री. राजेंद्र सोनवणे यांचा उत्साहपूर्ण सत्कार समारंभ संपन्न झाला.
या कार्यक्रमात संस्थेचे सचिव श्री. गोवर्धन चव्हाण यांनी शाल अर्पण करून, तर अध्यक्ष श्री. वसंतराव नेटके यांनी पुष्पगुच्छ देऊन सोनवणे यांचा सन्मान केला.
श्री. सोनवणे हे गेल्या अनेक वर्षांपासून परिसरातील स्वच्छतेचे कार्य निस्वार्थ भावनेने, नियमिततेने आणि जबाबदारीने पार पाडत आहेत. त्यांच्या या सेवाभावी कार्याची दखल घेऊन सोसायटीतर्फे त्यांचा हृदयपूर्वक गौरव करण्यात आला.
कार्यक्रमास म.न.पा.चे सेवानिवृत्त उपायुक्त श्री. वसंतराव सुरवाडे, श्री. संजय वानखेडे सर, श्री. नरोत्तम परमार, सौ. उषा नेटके, तसेच सौ. [नाव भरायचे आहे] उपस्थित होते. उपस्थित पाहुण्यांनी सोनवणे यांच्या कार्याचे कौतुक करत, समाजातील स्वच्छता कर्मचाऱ्यांप्रती आदरभाव व्यक्त केला.







