
(प्रतिनिधी) स्नेहा उत्तम मडावी पुणे
आज् रोजी पोलीस मित्र असोसिएशन व वेध फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बक्षीस वितरण व नवदुर्गा पुरस्कार वितरण समारंभ श्रीमंत नारायणराव घोरपडे नाट्यगृह, इचलकरंजी येथे पार पडला. पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर सहकारी बँकेच्या उपाध्यक्ष पदावरती अश्विनीताई कार्य करत असताना उद्योजन क्षेत्रात आदर्श व्यक्तीमत्व व समाजसेवेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल खेड तालुक्यातील राजगुरूनगर (तिन्हेवाडी )येथील उद्योजिका समाजसेविका अश्विनीताई राजेंद्र पाचारणे यांना यंदाचा ‘नवदुर्गा’ पुरस्काराने गौरविण्यात आले विशेष कार्यक्रमात सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री ‘सुरेखा कुडची’ यांच्या शुभहस्ते व अतिथींच्या उपस्थितीत सन्मान प्रदान करण्यात आला.अश्विनीताई पाचारणे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून महिलांच्या सक्षमीकरणासाठी, शिक्षण प्रसारासाठी तसेच सामाजिक समस्यांवर जनजागृतीसाठी सातत्याने कार्य केले आहे. उद्योजक क्षेत्रात देखील नावलौकिक मिळवलेला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना यंदाचा ‘ नवदुर्गा ‘ पुरस्कार देण्यात आला असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या सन्मानानंतर विविध सामाजिक संस्थांनी आणि नागरिकांनी अश्विनीताई यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.







