
जळगाव – महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेची जिल्हास्तरीय बैठक पद्मालय विश्रामगृह, जळगाव येथे उत्साहात पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या तर शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीग्रस्त नुकसानीवर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश राज्य सचिव मा. अमोल भिसे यांनी दिले.
बैठकीत आकाश सोनार व नरेश चनाल यांची जळगाव तालुका उपाध्यक्ष, विजय गवळी यांची सहसचिव, पुष्कराज पाटील यांची भडगाव तालुका सचिव, मंगेश पाटील यांची जळगाव शहर संघटक तर समाधान न्हावी यांची शहर उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. नियुक्तीपत्र वितरण राज्य सचिव अमोल भिसे यांच्या हस्ते संपन्न झाले. या प्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे आणि मनसे वृत्तांतचे मारुती दुनगे उपस्थित होते.
राज्य सचिव अमोल भिसे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शासनाकडून त्यांना योग्य ती भरपाई मिळवून देणे हे मनसे शेतकरी सेनेचे प्रमुख ध्येय आहे. प्रत्येक पदाधिकाऱ्याने दर महिन्याला शेतकऱ्यांसोबत बैठक घेऊन त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात आणि त्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहावे.”
मारुती दुनगे यांनी शेतकऱ्यांना शेतीसोबत जोड व्यवसायांबाबत मार्गदर्शन करण्याचे आवाहन केले. त्यांनी म्हटले, “शेतमालाला मार्केटमध्ये योग्य स्थान मिळवून देण्यासाठी तसेच एक्सपोर्ट क्वालिटीचा माल तयार करण्यासाठी प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली पाहिजेत. शेतकरी सक्षम झाला तर देश सक्षम होईल.”
मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे यांनी सांगितले की, “शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मनसे सातत्याने प्रयत्नशील आहे. प्रत्येक तालुक्यात ‘कृषी अवजारे बँक’ सुरू करण्याची योजना हाती घेण्यात आली असून या माध्यमातून शेतकऱ्यांना शेती विषयक साहित्य भाडे कराराने उपलब्ध होणार आहे.
या बैठकीस शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष कल्पेश पवार, श्रीकृष्ण मेंगडे, बंटी शर्मा, जिल्हा सचिव अमोल पाटील, तालुका अध्यक्ष प्रदीप पाटील, विनोद पाटील, उपाध्यक्ष किशोर वाघ, विलास सोनार, संदीप मांडोळे, सचिन पवार, राहुल चव्हाण, दिपक राठोड, भुषण ठाकुर, महिला शाखेच्या अनिता कापुरे, लक्ष्मी भिल आदी पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीच्या शेवटी नव्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले. आगामी काळात शेतकऱ्यांच्या हितासाठी तालुका व गावपातळीवर मोहिमा राबवून मनसे शेतकरी सेना आणखी बळकट करण्याचा निर्धार या वेळी करण्यात आला.
वरील बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकात प्रसिद्ध करावी विनंती.
आपला नम्र
अविनाश पाटील
जिल्हाध्यक्ष मनसे शेतकरी सेना, जळगांव







