
हिमायतनगर कृषी दुकानदारांकडून पूरग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत.
नांदेड जिल्हा प्रतिनिधी/अभिषेक बकेवाड
नांदेड – हिमायतनगर तालुक्यासह मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मागील काळात झालेल्या अतिवृष्टी मध्ये अतोनात नुकसान झाले आहे त्यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकांची प्रचंड हानी होऊन सणासुदीच्या दिवसात त्यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे त्यामुळे हिमायतनगर शहरातील व तालुका सीड्स फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड डीलर्स असोसिएशन या संघटनेकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुमच्या मुख्यमंत्री आर्थिक सहायता निधीमध्ये 82 हजार दोनशे रुपयाची आर्थिक रक्कम जमा करून त्याचा चेक हिमायतनगर येथील तहसीलदार पल्लवी टेमकर यांच्यामार्फत महाराष्ट्र सरकारला देण्यात आला आहे….
याबाबत सविस्तर वृत्त असे की हिमायतनगर तालुका सीड्स फर्टीलायझर्स अँड पेस्टिसाइड डीलर्स असोसिएशन या संघटने कडून जिल्ह्यात झालेल्या पूर परिस्थितीमध्ये अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाल्यामुळे त्यांना एक मायेचा आधार व आर्थिक स्वरूपात मदत करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मोठी भूमिका घेतली त्या भूमिकेचे हिमायतनगर येथील कृषी दुकानदारांनी स्वागत करून मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये 82 हजार दोनशे रुपयांचा थेट निधी जमा करून हिमायतनगर येथील तहसीलदार पल्लवी टेमकर यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज तो दिला आहे यावेळी हिमायतनगर तालुका फर्टिलायझर्स संघटनेचे तालुका अध्यक्ष मा.रमेशजी पळशीकर, उपाध्यक्ष मारोती लुमदे,श्यामसुंदर ढगे, दिलीप गुडेटवार, रामेश्वर पाकलवाड, संजय बलपेलवाड, गणेश पाळजकर, रवींद्र दमकोडवार,गजू तोकलवार,राजदत्त सूर्यवंशी सह आदी कृषी दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते







