
उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये Sresan Pharmaceuticals (चेन्नई) निर्मित Coldrif कफ सिरप मुळे अठरा मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तपासात या सिरपमध्ये घातक Diethylene Glycol (DEG) असल्याचे आढळले आहे.
अशा औषधांचा पुरवठा पुणे शहर, पुणे जिल्यात तसेच महाराष्ट्रात देखील होऊ नये म्हणून आम आदमी पार्टी पुणे शहराध्यक्ष प्रशांत कांबळे सामाजिक न्याय विभाग यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की Coldrif कफ सिरप व Sresan Pharma उत्पादने महाराष्ट्रात, पुण्यामध्ये तातडीने बंदी घालावीत.
पुणे शहर व जिल्ह्यातील सर्व कप सिरप कंपन्यांचे स्टॉक जप्त करून तपासणीसाठी पाठवावेत. औषध नियंत्रक विभागाने जनजागृती मोहीम राबवून पालकांना सावध करावे. तसेच इतरही औषध कंपन्यांचे सिरप नमुने तपासून दोष आढळल्यास कठोर फौजदारी कारवाई करावी.
मुलांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांना शिक्षा हवी,संरक्षण नाही! तातडीने यावरती सरकारने तसेच अन्न औषध प्रशासन आणि वैद्यकीय अधिकारी पोलीस प्रशासन यांनी संयुक्तपणे तातडीने यंत्रणा राबवणे अत्यंत गरजेचे आहे. हा सर्व प्रकार जीवाशी असल्यामुळे जरी महाराष्ट्र बाहेर घडला असला देखील अशा कंपन्या पुणे शहर महाराष्ट्र मध्ये असल्याचे टाळता येणार नाही. नाहीतर सरकारी काम आणि सहा महिने थांब अशा उपायोजना जीवाशी नकोय. कारवाईचे पत्र जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे महानगरपालिका यांना देण्यात आलेले आहे. अशी माहिती प्रशांत कांबळे यांनी दीली आहे.







