
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत साकळी व कांताई नेत्रालय, जळगाव यांचा उपक्रम
उपसंपादक:- मिलिंद जंजाळे
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामपंचायत साकळी आणि जळगाव येथील सुप्रसिद्ध कांताई नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने सलग तिसऱ्या वर्षी मोफत मोतीबिंदू नेत्र तपासणी शिबिराचे भव्य आयोजन करण्यात आले.
ग्रामपंचायत कार्यालय, साकळी येथे आयोजित या शिबिरात परिसरातील नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती होती. विशेषतः मोतीबिंदूने त्रस्त असलेल्या ग्रामीण भागातील रुग्णांना या शिबिराचा मोठा फायदा झाला. तज्ञ डॉक्टर व नेत्रतपासणी पथकाने उपस्थित रुग्णांची तपासणी करून आवश्यक ते मार्गदर्शन व उपचार सेवा पुरविली.
ग्रामपंचायत साकळीच्या वतीने नागरिकांना मोफत नेत्रतपासणी, निदान आणि पुढील उपचारासाठी आवश्यक सुविधा देण्यात आल्या. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, कर्मचारी तसेच आरोग्य विभागाचे सहकार्य लाभले.या शिबिरामुळे साकळी व परिसरातील नागरिकांना मोफत व दर्जेदार नेत्र तपासणीची संधी मिळाली असून, विशेषतः वृद्ध नागरिकांसाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला आहे.







